Video US Navy warship USS Portland tests laser weapon to destroy aircraft mid-air hrb | खतरनाक Video! अमेरिकेच्या नौदलाकडे नवे संहारक शस्त्र; दारुगोळ्याशिवाय विमान केले नष्ट

खतरनाक Video! अमेरिकेच्या नौदलाकडे नवे संहारक शस्त्र; दारुगोळ्याशिवाय विमान केले नष्ट

एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे जागतिक तणाव निर्माण झालेला असताना महाशक्ती बनण्यासाठी मोठमोठे देश शस्त्रांस्त्रांचे भांडार उभे करण्यात व्यस्त आहेत. चीनमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच चीनने समुद्राचे २००० किमी क्षेत्रफळ बंद केले असून ७० दिवसांचा युद्धसराव सुरु केला आहे. चीनच्या मोठमोठ्या शस्त्रांनाही भारी पडेल असे शस्त्र अमेरिकेने विकसित केले आहे. 


अमेरिकेच्या नौसेनेने एक उच्च भारित लेझर शस्त्राचे यशस्वीरित्या परीक्षण केले आहे. या लेझर किरणाद्वारे अमेरिकेच्या नौदलाने जहाजावरून विमान उद्ध्वस्त करून दाखविले आहे. महत्वाचे म्हणजे हे परीक्षण प्रशांत महासागरात करण्यात आले. याचे फोटो आणि व्हिडीओ अमेरिकेने प्रसिद्ध केले आहेत.

 

व्हिडीओमध्ये अमेरिकेच्या युद्धनौकेच्या डेकवरून एक वेगवान लेझर लाईट निघाली आहे आणि त्यानंतर समोरून येणारे ड्रोन विमान जळताना दाखविले आहे. अमेरिकेच्या प्रशांत महासागरातील नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे लेझर उपकरण शत्रुचे ड्रोन, शस्त्रे असणारी छोटी जहाजे यांच्याविरोधात वापरले जाऊ  शकणार आहे. 


अमेरिकेच्या नौदलाने हे परीक्षण १६ मे रोजी केले आहे. लेझर किरणांचा वापर माणसाच्या भल्यासाठी केला जातो.  शस्त्रक्रिया किंवा एखादा स्पॉट दाखविताना केला जातो. मात्र, या किरणांची क्षमता तेवढी संहारक नसते. अमेरिकेच्या नौदलाकडे असलेल्या या शस्त्राची ताकद १५० किलोवॉट असू शकते. असे इंटरनॅशनल इंन्सिट्युट ऑफ स्ट्रॅटेजिक स्डडीजच्या २०१८ मध्ये आलेल्या अहवालात म्हटले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

थकलेल्या EMI वरील व्याजवसुली थांबणार? आरबीआयला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

ठोश्याला ठोसा! चीनचे जेवढे सैनिक तेवढेच भारताचे जवान होणार तैनात

प्रेमवीराने प्रेयसीला भेटविण्याची गळ घातली; सोनू सुदने दिले खतरनाक उत्तर

धक्कादायक! चीनची कोरोनाविरोधावर मोठी चाल; दोन युद्धनौका तैवानच्या दिशेने रवाना

राष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले

स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video US Navy warship USS Portland tests laser weapon to destroy aircraft mid-air hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.