Big Heart India! Nepali people want medical help, india airlift from Australia hrb | विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली

विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली

चीनच्या नादाला लागून नेपाळनेभारतीय भूभागावर दावा करत तेथे व्यापारासाठी रस्ता खोदण्यास सुरुवात केली आहे. तर नेपाळच्या पंतप्रधानांनी भारतावा कोरोना पसरवत असल्याचा आरोप केला आहे. आजतर नेपाळच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताविरोधात प्रसंगी सैन्याचा वापर करण्याची धमकी दिली आहे. मात्र, तरीही भारताने नेपाळला मदत देऊ केली आहे. 

सध्या भारत आणि नेपाळमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच नेपाळने भारताकडे मदत मागितली होती. याला भारताने न नाकारता तत्काळ देऊ केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एका नेपाळी नागरिकाला तत्काळ वैद्यकीय उपचाराची गरज होती. नेपाळने भारताकडे मदतीची याचना केली. लगेचच या तीन नेपाळींना एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला आणण्यात आले. 


ज्या नेपाळींना दिल्लीला आणण्यात आले आहे, त्यांच्यापैकी एकाचे बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया करायची आहे. दुसरा व्यक्ती रुग्णाचा भाऊ असून तो हे बोनमॅरो देणार आहे. त्यांच्यासोबत त्यांचे वडीलही आहेत. 


नेपाळची मदत अशासाठी केली की, नेपाळसोबतची मैत्री वेगळीच आहे. दोन्ही देशांचे नागरिक एकमेकांसोबत भावनांनी जोडलेले आहेत. १९५० च्या करारानुसार भारतीय नागरिकांना जेवढ्या सुविधा मिळतात तेवढ्याच सुविधा नेपाळी नागरिकांनाही दिल्य़ा जातात. नेपाळने गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधात आक्रमक पाऊले उचलली आहेत. भारतीय भागाचा त्यांच्या नकाशामध्ये समावेश करत एक जुना रस्ते प्रकल्प सुरु केला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

चीनचा थरकाप उडणार! भारताची 18वी खतरनाक 'फ्लाइंग बुलेट' झेपावणार

कंगाल पाकिस्तानला कोरोना पावला; 'या' देशाकडून लाखो डॉलरची मदत

भन्नाट! सहा कॅमेऱ्यांचा Redmi K30i 5G लाँच; किंमतही आवाक्यात

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

CoronaVirus कोरोनामुळे जग बुडाले पण फेसबुकद्वारे जोडणारा झकरबर्ग मालामाल झाला

CoronaVirus अडेलतट्टू चीन नरमला; तातडीने कोरोना जन्माच्या तपासाला तयार झाला

चीनला हादरा! इकडे भारतावर दादागिरीचे प्रयत्न; तिकडे हाँगकाँग निसटण्याच्या बेतात

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Big Heart India! Nepali people want medical help, india airlift from Australia hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.