चीनचा थरकाप उडणार! भारताची 18वी खतरनाक 'फ्लाइंग बुलेट' झेपावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 03:43 PM2020-05-25T15:43:01+5:302020-05-25T16:10:05+5:30

हवाईदलाच्या या १८ व्या स्क्वाड्रनची स्थापना १५ एप्रिल १९६५ मध्ये करण्यात आली होती. या स्क्वाड्रनचे ब्रीदवाक्य 'तीव्र और निर्भय' असे ठेवण्यात आले होते. ही स्क्वाड्रन १५ एप्रिल २०१६ पर्यंत मिग २७ ही विमाने वापरत होती.

लडाख आणि सिक्कीमच्या सीमेवर चीनच्या कुरघोड्या सुरु झाल्या आहेत. यामुळे दोन्ही देशांदरम्यान तणावाचे वातावरण असून चीनला प्रत्यूत्तर देण्यासाठी हवाई दल प्रमुख आर के एस भदौरिया २७ मे रोजी हवाईदलाची१८ वी स्क्वाड्रन 'फ्लाइंग बुलेट' अॅक्टीव्ह करणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन कोईम्बतूरच्या जवळील हवाईतळावर केले जाणार आहे. ही स्क्वाड्रन LCA तेजस विमानांची असणार आहे. तेजस ही स्वदेशी लढाऊ विमाने ताफ्यामध्ये असलेली हवाईदलाची ही दुसरी तुकडी असणार आहे.

हवाईदलाच्या या १८ व्या स्क्वाड्रनची स्थापना १५ एप्रिल १९६५ मध्ये करण्यात आली होती. या स्क्वाड्रनचे ब्रीदवाक्य 'तीव्र और निर्भय' असे ठेवण्यात आले होते. ही स्क्वाड्रन १५ एप्रिल २०१६ पर्यंत मिग २७ ही विमाने उडवित होती.

जवळपास चार वर्षांनी पुन्हा ही स्क्वाड्रन अॅक्टिव्ह होणार आहे. ती देखील अशावेळी जेव्हा भारताला चीन आणि पाकिस्तानकडून धोक्याचे संकेत मिळत आहेत.

या स्क्वाड्रनने १९७१ च्या युद्धामध्ये भाग घेतला होता. या स्क्वाड्रनचे फ्लाईंग ऑफिसर निर्मल जीत सिंह सेखों यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

या स्क्वाड्रनचा तळ तेव्हा श्रीनगरमध्ये होता. डिफेंडर्स ऑफ़ कश्मीर व्हॅली या ऑपरेशनवर ही स्क्वाड्रन तैनात होती.

तेजस हे लढाऊ विमान स्वदेशी निर्मिती असून टेललेस कंपाऊंड डेल्टा विंग लढाऊ विमान आहे. हे विमान फ्लाय़ बाय वायर फ्लाईट कंट्रोल सिस्टिम, डिजिटल एव्हियोनिक्स, मल्टीमोड रडारने युक्त आहे.

हे चौथ्या पिढीचे सुपरसोनिक लढाऊ विमान आहे. तसेच या प्रकारातील हलके आणि छोटे विमान आहे.

चीनने मानवरहित हेलिकॉप्टर बनविले असून ते भारताच्या सीमांवर तैनात केले आहे. तसेच गेल्या आठवड्यात लडाखमध्ये ३०० सैनिकही तैनात केले आहेत.

याला प्रत्यूत्तर म्हणून भारतानेही जवानांना तैनात केले असून चीनी सैनिकांची वाट अडविण्य़ात आली आहे.

येत्या जुलैमध्ये भारतीय हवाईदलाला फ्रान्सची नवीन राफेल विमाने मिळणार आहेत. यामुळे भारताची ताकद आणखी वाढणार असून चीन आणि पाकिस्तानला शह देण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

चीनच्या सैनिकांबरोबच हॅलिकॉप्टरनेदेखील भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. तेव्हा लगेचच भारतीय लढाऊ विमानांनी हवेत झेपावत हेलिकॉप्टरला परत जाण्यास सांगितले होते.