CoronaVirus कोरोनामुळे जग बुडाले; पण फेसबुकचा मार्क झकरबर्ग मालामाल झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 07:37 PM2020-05-24T19:37:25+5:302020-05-24T19:47:48+5:30

मार्च महिन्याच्या मध्यावर झकरबर्गची एकूण संपत्ती 57.5 अब्ज डॉलर होती. आता त्याची संपत्ती ८७.५ अब्ज डॉलर झाली आहे.

CoronaVirus news facebook mark zuckerberg welath increased by 30 billion dollar in crisis hrb | CoronaVirus कोरोनामुळे जग बुडाले; पण फेसबुकचा मार्क झकरबर्ग मालामाल झाला

CoronaVirus कोरोनामुळे जग बुडाले; पण फेसबुकचा मार्क झकरबर्ग मालामाल झाला

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्ग कमालीचा चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झकरबर्गने रिलायन्स जिओमध्ये पैसे ओतले होते. तसेच कर्मचाऱ्यांना पुढील १० वर्षे घरातूनच काम करण्याची ऑफर दिली होती. आज तर झकरबर्ग आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे.


कोरोना संकटामुळे एकीकडे अब्जाधिशांची संपत्ती कमालीची घटत चालली आहे. मोठमोठ्या देशांची गंगाजळी आटत चालली आहे. मात्र, झकरबर्गची संपत्ती कमालीची वाढत चालली आहे. हो खरे वाटणार नाही, पण झकरबर्गच्या संपत्तीत गेल्या दोन महिन्यांत ३० अब्ज डॉलरची भर पडली आहे. 


मार्च महिन्याच्या मध्यावर झकरबर्गची एकूण संपत्ती 57.5 अब्ज डॉलर होती. आता त्याची संपत्ती ८७.५ अब्ज डॉलर झाली आहे. ब्लुमबर्गने दिलेल्या आकडेवारीनुसार झकरबर्ग तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांनी ही झेप घेतली आहे. सध्या झकरबर्गने वॉरेन बफेटनाही मागे टाकले आहे.


जेव्हा फेसबुकने ऑनलाईन शॉपिंग फीचर शॉपची सुरुवात केली, तेव्हा शेअरची किंमत उच्च पातळीवर गेली आहे. फेसबुकच्या एका शेअरचा दर २३० डॉलरवर गेला आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus अडेलतट्टू चीन नरमला; तातडीने कोरोना जन्माच्या तपासाला तयार झाला

चीनला हादरा! इकडे भारतावर दादागिरीचे प्रयत्न; तिकडे हाँगकाँग निसटण्याच्या बेतात

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

CoronaVirus रक्तदात्यांनो! महाराष्ट्राला तुमची गरज आहे; उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती

Lockdown 4 : दीड महिन्याने यथेच्छ दारुचे प्राशन; घरी येताच मृत्यू

खतरनाक Video! अमेरिकेच्या नौदलाकडे नवे संहारक शस्त्र; दारुगोळ्याशिवाय विमान केले नष्ट

Web Title: CoronaVirus news facebook mark zuckerberg welath increased by 30 billion dollar in crisis hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.