China's big move on Corona oppose; Two warships sent towards Taiwan hrb | धक्कादायक! चीनची कोरोनाविरोधावर मोठी चाल; दोन युद्धनौका तैवानच्या दिशेने रवाना

धक्कादायक! चीनची कोरोनाविरोधावर मोठी चाल; दोन युद्धनौका तैवानच्या दिशेने रवाना

बिजिंग : कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून चारही बाजुंनी घेरल्या गेलेल्या चीनने मोठी चाल खेळली आहे. अनेक देशांनी चीनवर कोरोनाची महामारी लपविल्याचा आरोप केला आहे. आता चीनमध्येच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले असताना नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादाला हवा देण्याचे काम सुरु झाले आहे. 


या रणनितीनुसार चीनने भारताविरोधातही सीमावाद पुन्हा उकरून काढला आहे. याचबरोबर चीनने तैवानच्या दिशेने दोन विमानवाहू युद्धनौका रवाना केल्या असून यामुळे तैवानवरील हल्ल्याची शक्यता वाढली आहे. यामुळे अमेरिका आणि चीनच्या आधीच ताणलेल्या संबंधांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 


चीनचे नेते ली केकियांग यांनी सांगितले होते की, त्यांचा देश तैवानला एकत्र घेऊ इच्छित आहे. विमानवाहू युद्धनौका लियाओनिंग आणि शेडोंग सध्या यलो समुद्रच्या बोहाई खाडीमध्ये या मिशनची तयारी करत आहेत. या युद्धनौका तैवानच्या जवळच असलेल्या प्रटास बेटांवर पाठविण्यात येत आहेत. येथे या नौका युद्धसरावामध्ये सहभागी होतील. 


याआधी अमेरिकेने चीनच्या ३३ कंपन्यांवर प्रतिबंध लादले होते. या कंपन्यांवर अल्पसंख्यांक वुईगर समुदायाची हेरगिरी करणे आणि चीनच्या सैन्यासोबत संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कोरोनामुळेही चीनवर अमेरिका दबाव आणत आहे. याचबरोबर देशातही कोरोना वाढत असल्याने चीन संकटात सापडला आहे. यातूनच चीनने भारतविरोधी पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच तैवान ताब्यात घेण्यासाठी तैवानच्या खाडीसारखी परिस्थिती असलेल्या ठिकाणी युद्धसराव सुरु केला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

राष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले

स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली

चीनचा थरकाप उडणार! भारताची 18वी खतरनाक 'फ्लाइंग बुलेट' झेपावणार

कंगाल पाकिस्तानला कोरोना पावला; 'या' देशाकडून लाखो डॉलरची मदत

भन्नाट! सहा कॅमेऱ्यांचा Redmi K30i 5G लाँच; किंमतही आवाक्यात

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: China's big move on Corona oppose; Two warships sent towards Taiwan hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.