आखाती देशांजवळ पोहोचल्या अमेरिकेच्या युद्धनौका, डोनाल्ड ट्रम्प इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 07:50 IST2026-01-27T07:48:50+5:302026-01-27T07:50:41+5:30

US-Iran Conflict News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग जमून तणाव वाढला आहे.

US warships reach Gulf countries, will Donald Trump attack Iran at any moment? | आखाती देशांजवळ पोहोचल्या अमेरिकेच्या युद्धनौका, डोनाल्ड ट्रम्प इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला करणार?

आखाती देशांजवळ पोहोचल्या अमेरिकेच्या युद्धनौका, डोनाल्ड ट्रम्प इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला करणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग जमून तणाव वाढला आहे. याचदरम्यान, अमेरिकेच्या विमानवाहू नौकांसह युद्धनौका मध्य पूर्वेत पोहोचल्याने आता डोनाल्ड ट्रम्प हे इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला करण्याचे आदेश देणार का? असी चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकन नौदलाचा अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राईक ग्रुप सोमवारी अमेरिकन सेंट्रल कमांडच्या परिसरात पोहोचला आहे. इराणसोबत वाढत असलेल्या तणावादरम्यान इंडो-पॅसिफिकमध्ये सुरू असलेल्या मोहिमेतून वगळून या युद्धनौकांना आखाती भागात पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे इराणवर हल्ला करण्याचे आदेश देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

यूएसएस अब्राहम लिंकन ही अणुशक्तीवर चालणारी विमानवाहू नौका आणि कॅरियर स्ट्राईक ग्रुप-३ ने १९ जानेवारी रोजी मलक्काची सामुद्रधुनी पार केली होती. ही विमानवाहू युद्धनौका आणि तिचा स्ट्राईक ग्रुप मध्ये पूर्वेमध्ये प्रादेशिक सुरक्षा आणि स्थैर्याला टिकवण्यासाठी तैनाात करण्यात आले आहे, असे अमेरिकन सेंट्रल कमांडने समाज माध्यमांवर माहिती देऊन सांगितले होते.

दरम्यान, इराणमध्ये सुरू असलेली आंदोलने आणि खामेनेई प्रशासनाकडून हे आंदोलन चिरडण्यासाठी सुरू असलेल्या दहपशाहीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता. तसेच आता अमेरिकेने आखाती देशांजवळच्या समुद्रात सुरू केलेल्या सैनिकी हालचाली म्हणजे इराणमध्ये आंदोलन दडपण्यासाठी खामेनेई प्रशासनाकडून सुरू असलेल्या दपडशाहीविरोधात दबाव आणण्याचे तंत्र असल्याचे बोलले जात आहे. 

Web Title : अमेरिकी युद्धपोत खाड़ी के पास: क्या ट्रम्प ईरान पर हमला करने वाले हैं?

Web Summary : बढ़ते तनाव के बीच, अब्राहम लिंकन वाहक समूह सहित अमेरिकी युद्धपोत मध्य पूर्व में पहुंच गए हैं। इससे ईरान पर संभावित आसन्न हमले की अटकलें तेज हो गई हैं, खासकर ट्रम्प के आक्रामक रुख और ईरान के आंतरिक अशांति को देखते हुए।

Web Title : US Warships Near Gulf: Is Trump About to Strike Iran?

Web Summary : Amid rising tensions, US warships, including the Abraham Lincoln carrier group, have arrived in the Middle East. This fuels speculation about a potential imminent strike on Iran, especially given Trump's aggressive stance and Iran's internal unrest.