शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

मादुरो, खामेनेईंनंतर पुढील लक्ष्य किम जोंग उन? अमेरिकेच्या युद्धनौका, लढाऊ विमाने उत्तर कोरियाच्या वेशीवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 08:52 IST

US South Korea Drill : अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात आता उत्तर कोरिया केंद्रस्थानी आहे. व्हेनेझुएला आणि इराणमधील हस्तक्षेपानंतर किम जोंग उन यांच्यावर कारवाई होणार का? मध्य-पूर्वेत युद्ध सुरू असतानाच अमेरिका आणि दक्षिण कोरियाने लष्करी सराव सुरू केला आहे. उत्तर कोरियाच्या सीमेवर तणाव वाढला असून जगावर युद्धाचे सावट.

एकीकडे मध्य-पूर्वेत अमेरिकेचे इराणसोबत युद्ध सुरू असतानाच, दुसरीकडे पूर्व आशियातही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने आजपासून आपला सर्वात मोठा वार्षिक संयुक्त लष्करी सराव 'फ्रीडम शील्ड' सुरू केला आहे. या पावलामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन संतापण्याची शक्यता असून आशियात तणाव वाढला आहे.

जागतिक स्तरावर या लष्करी सरावाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. अमेरिका सध्या इराणसोबतच्या संघर्षात व्यस्त असतानाही, दक्षिण कोरियासोबत लष्करी सराव करून त्यांनी चीन आणि उत्तर कोरियाला स्पष्ट संकेत दिले आहेत. या सरावात हजारो सैनिक, अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि युद्धनौका सहभागी झाल्या आहेत.

उत्तर कोरियाचा 'अणू' इशारा
उत्तर कोरियाने या लष्करी सरावाचा नेहमीच निषेध केला असून, याला "युद्धाची रंगीत तालीम" असे म्हटले आहे. इराणमधील संघर्षाचा फायदा घेऊन उत्तर कोरिया एखादी मोठी क्षेपणास्त्र चाचणी किंवा अण्वस्त्र चाचणी करून अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याची भीती संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दक्षिण कोरियासोबतचा लष्करी सराव ही नांदी?
मध्य-पूर्वेत युद्ध सुरू असतानाच अमेरिकेने दक्षिण कोरियासोबत सुरू केलेला विशाल लष्करी सराव हा केवळ सराव नसून, तो उत्तर कोरियाला दिलेला थेट इशारा मानला जात आहे. जर किम जोंग उन यांनी इराण युद्धाचा फायदा घेऊन कोणतीही कुरापत काढली, तर अमेरिका त्यांच्यावर तुटून पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

काय आहे अमेरिकेची रणनीती?
अमेरिकेने गेल्या काही काळापासून आपल्या शत्रू राष्ट्रांमधील सत्तापालट किंवा तिथल्या संसाधनांवर नियंत्रण मिळवण्याची रणनीती आखली आहे.
१. व्हेनेझुएला: निकोलस मादुरो यांच्या राजवटीला अस्थिर करून तिथल्या तेल साठ्यांवर दबाव निर्माण केला.
२. इराण: सध्या इराणमधील 'सुप्रीम लीडर' बदलल्यानंतर अमेरिकेने लष्करी आक्रमकता वाढवली आहे.
३. उत्तर कोरिया: आता किम जोंग उन यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला खीळ घालण्यासाठी अमेरिका 'थेट कारवाई'च्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट?
जर अमेरिकेने उत्तर कोरियाला लक्ष्य केले, तर चीन आणि रशिया गप्प बसण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत हे युद्ध केवळ दोन देशांपुरते मर्यादित न राहता त्याचे रूपांतर जागतिक महायुद्धात होऊ शकते. यामुळे जागतिक शेअर बाजार आणि पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : After Iran, North Korea next? US military might near Kim's doorstep.

Web Summary : Amid Iran tensions, US-South Korea drills escalate North Korea threat. Kim's nuclear ambitions face potential US action, risking global conflict involving China and Russia. World war looms?
टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनAmericaअमेरिकाSouth Koreaदक्षिण कोरियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराण