शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका करणार जॉन्सन अँड जॉन्सनच्या १० कोटी लसींची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:49 IST

अमेरिकी नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येतील व त्यातून अतिरिक्त लसी राहिल्या तर त्याचा जगाला पुरवठा करण्यात येईल, असे बायडेन यांनी नुकतेच सांगितले होते.

वॉशिंग्टन : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या आणखी १० कोटी लसींची खरेदी करण्याचा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे अमेरिकेकडे लसीचा अतिरिक्त साठा होण्याची शक्यता आहे. त्यातून अमेरिका जगाला लसींचा पुरवठा करू शकेल. अमेरिकेमध्ये प्रत्येक प्रौढ व्यक्तीला आता कोरोना लस देण्यात येणार आहे. (US to buy 100 million Johnson & Johnson vaccines)

अमेरिकी नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येतील व त्यातून अतिरिक्त लसी राहिल्या तर त्याचा जगाला पुरवठा करण्यात येईल, असे बायडेन यांनी नुकतेच सांगितले होते. अमेरिकेतील लहान मुलांकरिता कोणती लस प्रभावी ठरेल, यावर अद्याप पुरेसे संशोधन झालेले नाही. त्या संशोधनाचे निष्कर्ष हाती आल्यानंतर लहान मुलांनाही कोरोनाची लस देण्याबाबत बायडेन सरकार धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. 

४० कोटी लोकांना पुरेल इतका कोरोना लसींचा साठा करण्यावर व प्रत्येक नागरिकाला जुलै अखेरपर्यंत कोरोना लस देण्यावर बायडेन सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅस्ट्राझेनेका व नोवावॅक्स कंपनीच्या कोरोना लसींचीही खरेदी करण्यात येईल.

मेक्सिको, युरोपीय देशांकडून लसींची मागणीअमेरिकेकडे मेक्सिको, युरोपीय देश तसेच कॅनडाने कोरोना लसींची मागणी केली आहे. मात्र, त्यापैकी कोणालाही अमेरिकेने अद्याप लसीचा पुरवठा केलेला नाही. ४५ देशांना चीनने त्याची लस पुरविली. २.६ अब्ज लसींचे दरवर्षी उत्पादन आम्ही करू शकतो, असा दावा चीनमधील चार औषधी कंपन्यांनी केला आहे. रशियानेही स्पुटनिक लसीचा जगातील काही देशांना पुरवठा केला आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited Statesअमेरिका