शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा मसूद अझहरप्रकरणी चीनला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 05:37 IST

खोडा घातल्याचा परिणाम; अन्य पावले उचलण्याची शक्यता

वॉशिंग्टन : जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात चीनने चौथ्यांदा खोडा घातला आहे. यामुळे नाराज झालेल्या संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी (यूएनएससी) इशारा दिला आहे की, जर चीन आपल्या भूमिकेवर ठाम राहिला तर परिषदेतील सदस्य अन्य पर्याय स्वीकारु शकतात. अन्य पाऊले उचलण्यास भाग पाडू नका.सुरक्षा परिषदेच्या एका दूताने कठोर इशारा देत चीनला बजावले आहे की, जर चीनने आमच्या कार्यात अडथळा आणला तर आम्ही अन्य पाऊले उचलू शकतो. सुरक्षा परिषदेच्या या दूताने आपली ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर एका वृत्तसंस्थेला सांगितले की, चीनची ही भूमिका दहशतवादाविरुद्ध लढणे आणि दक्षिण आशियात स्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नातील अडथळा आहे. पाकिस्तानच्या भूमीवरील सक्रीय दहशतवादी समूह आणि त्यांचे प्रमुख यांना वाचविण्यासाठी चीनवर अवलंबून राहत असल्याबद्दल पाकिस्तानवरही या दूतांनी टीका केली. अमेरिकी काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेरमॅन म्हणाले की, अझहरवर प्रतिबंध लावण्यासाठी चीनने सहकार्य करावे. चीनकडून समर्थनमसूद अझहरप्रकरणी चीनने आपल्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले की, या विषयावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यास संबंधित देशांमध्ये चर्चेसाठी यातून मदत मिळू शकेल. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले की, बिजिंगचा निर्णय समितीच्या नियमांनुसारच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी भारतासह अन्य सदस्यांशी समन्वय करण्यास चीन तयार आहे.

टॅग्स :masood azharमसूद अजहरchinaचीनPakistanपाकिस्तानUnited Statesअमेरिका