गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 08:57 IST2025-05-16T08:57:08+5:302025-05-16T08:57:41+5:30

Turkey, China Earthquake: तुर्की आणि चीनला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याच्या मधल्या काळात अफगानिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Turkey was shaken on Thursday evening and China in the morning; After Pakistan, countries supporting it felt earthquake shocks | गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के

गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानची बाजू घेणारा, तसेच अरुणाचलमधील भागांची नावे बदलण्याची आगळीक करणारा चीन शुक्रवारी पहाटे हादरला आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे चीनची जमीन थरथरली आहे. चीनला आज भूकंपाचे धक्के बसले आहेत. एवढेच नाही तर गुरुवारी सायंकाळी तुर्कीला देखील भूकंपाचे हादरे बसले आहेत. 

आज पहाटे साडे तीनच्या सुमारास आलेल्या चीनमधील भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. तर तुर्कीला बसलेला धक्का हा थोडा मोठा होता. तुर्कीला 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. चीनमधील भूकंपाचे केंद्र जमिनीखाली १० किमीवर होते, असे सांगण्यात आले आहे. 

तुर्की आणि चीनला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याच्या मधल्या काळात अफगानिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. १२.४७ वाजता अफगानिस्तानात भूकंप जाणवला होता. 

पाकिस्तान आणि भारतादरम्यान युद्धसदृष्य स्थिती असताना भारताने पाकिस्तानवर हल्ला चढविला होता, तेव्हा पाकिस्तानाच बलुचिस्तान प्रांतात भूकंप झाला होता. हवेतून हल्ले होत असताना पाकिस्तानची धरती देखील हादरली होती. याचा संबंध पाकिस्तानची अण्वस्त्रे ठेवलेल्या भागावर, किराना हिल्सवर भारताने मारा केल्याशी जोडला जात होता. परंतू, अद्याप अशी कोणतीही स्पष्टता झालेली नाही. अमेरिकेचे विमान पाठविल्याचे किंवा अण्वस्त्रांवर नियंत्रण ठेवणारी जागतिक संस्थेने देखील पाकिस्तानमध्ये रेडिएशन लीक झाल्याचे म्हटलेले नाही. 

२०२३ मध्ये तुर्कीला मोठा झटका बसलेला...
६ फेब्रुवारी २०२३ रोजी तुर्कस्तानमध्ये ७.८ तीव्रतेचा मोठा भूकंप झाला होता. यानंतर पुन्हा हादरा बसला होता. तेव्हा भारताने मोठी मदत तुर्कीला पाठविली होती. या दोन दोन भूकंपांमध्ये ५३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. लाखो इमारती पूर्णपणे किंवा अंशतः उद्ध्वस्त झाल्या होत्या.  

Web Title: Turkey was shaken on Thursday evening and China in the morning; After Pakistan, countries supporting it felt earthquake shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.