तुर्कस्तानची राजधानी अंकारात दहशतवादी हल्ला, ८६ ठार

By Admin | Updated: October 10, 2015 19:09 IST2015-10-10T15:20:37+5:302015-10-10T19:09:49+5:30

तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे झालेल्या दोन साखळी स्फोटांत ८६ नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.

Terrorist attack in Turkey's capital, 86 killed | तुर्कस्तानची राजधानी अंकारात दहशतवादी हल्ला, ८६ ठार

तुर्कस्तानची राजधानी अंकारात दहशतवादी हल्ला, ८६ ठार

>ऑनलाइन लोकमत
अंकारा, दि. १० - तुर्कस्तानची राजधानी अंकारा शनिवारी दोन स्फोटांनी हादरली असून त्यात ८६ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. शांतता मोर्चासाठी जमलेल्या नागरिकांना लक्ष्य करीत अंकारा स्टेशनजवळ झालेल्या या दोन बॉम्बस्फोटात ८६ जण ठार १८६हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. 
तुर्कस्तान सरकारच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील मुख्य चौकात झालेले हे स्फोट दहशतवादी हल्ला असून ते आत्मघाती दहशतवाद्यांनी केले आहेत. 
शनिवार हा सुट्टीचा दिवस असल्याने शहरातील चौकात जास्त गर्दी होती, त्यामुळे बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

Web Title: Terrorist attack in Turkey's capital, 86 killed