अफगणिस्तानमध्ये भारतीय दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला

By Admin | Updated: March 2, 2016 15:11 IST2016-03-02T13:46:14+5:302016-03-02T15:11:14+5:30

पश्चिम अफगाणिस्तानमधील जलालाबाद शहरात दहशतवादी हल्ला झाला असून 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे

Terrorist attack outside of Indian embassy in Afghanistan | अफगणिस्तानमध्ये भारतीय दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला

अफगणिस्तानमध्ये भारतीय दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला

>ऑनलाइन लोकमत - 
अफगाणिस्तान, दि. २ - पश्चिम अफगाणिस्तानमधील जलालाबाद शहरांत झालेल्या दहशतवादी हल्यातील 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आज सकाळी जलालाबादमधील भारतीय दुतावासाच्या बाहेर आत्मघाती स्फोट झाला. यावेळी फायरिंदेखील करण्यात आली. भारतीय दुतावासाबाहेर झालेल्या स्फोटासोबत अजून एक स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळच्या इमारतींच्या तसंच गाड्यांच्या काचा फुटल्या. 9 गाड्यांच नुकसान झालं आहे. या हल्यात 19 लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय दुतावासाबाहेर झालेल्या या हल्यात भारतीय कर्मचारी मात्र सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. सध्या कोम्बिंग ऑपरेशन सुरु असून अजून कोणी दहशतवादी लपला आहे का याचा तपास करत आहेत.
 

Web Title: Terrorist attack outside of Indian embassy in Afghanistan