शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच समोर आला तालिबानचा खरा चेहरा; मुला-मुलींच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 6:59 PM

तालिबानने गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी बऱ्याच बदलांचे आश्वासन दिले होते. मात्र, जसजसा वेळ जात आहे, तसतसा तालिबानचा खरा चेहरा जगासमोर येऊ लागला आहे. (Taliban in Afghanistan)

अफगाणिस्तानवरतालिबानने ताबा मिळवून 15 दिवस होत आहेत. 15 ऑगस्ट रोजी, तालिबानीदहशतवाद्यांनी राजधानी काबूलवर कब्जा केला. यानंतर संपूर्ण देशात तालिबानचे राज्य सुरू झाले. तालिबानने गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी बऱ्याच बदलांचे आश्वासन दिले होते. मात्र, जसजसा वेळ जात आहे, तसतसा तालिबानचा खरा चेहरा जगासमोर येऊ लागला आहे. खरे तर, तालिबानच्या प्रवक्त्याने महिलांना अनेक प्रकारची सूट देण्याची घोषणा केली होती. पण आता त्यांनी निर्बंध लादायला सुरुवात केली आहे. तालिबानने विद्यापीठात मिला-मुलींच्या एकत्रित शिकण्यावर बंदी घातली आहे. (Taliban says boys and girls will no longer study together in afghanistan university)

अफगाणिस्तानच्या कार्यवाहक शिक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे, की मुले आणि मुलींना विद्यापीठांतून एकत्रपणे शिक्षण घेता येणार नाही. तसेच इस्लामिक कायद्या प्रमाणे त्यांना स्वतंत्रपणे शिकावे लागेल, असे ट्विट अफगाणिस्तानातील एक पत्रकार झियार खान याद यांनी केले आहे.

अमेरिकेची महाभयंकर चूक, तालिबानला सोपवली 'अफगाण सहकाऱ्यांची' यादी...!

यापूर्वी, नुकतेच तालिबानी दहशतवाद्यांनी हेरात प्रांतातही असाच आदेश जारी केला होता. यात, शासकीय आणि खाजगी विद्यापीठांत मुले आणि मुली एकाच वर्गात एकत्र बसून शिकू शकणार नाहीत, असे म्हटले होते. एवढेच नाही, तर यासंदर्भात विद्यापीठांचे प्राध्यापक आणि महाविद्यालयांच्या मालकांसोबत बैठकही घेण्यात आली होती.

नेतृत्वावरून तालिबानमध्येच गटबाजी -"अफगाणिस्तानात स्थानिक पातळीवर परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबान अधिकाधिक विभाजित होत आहे. विविध गट आधीच आपापल्या बैठका घेत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तालिबानमध्ये कमांड देण्याच्या बाबतीत ऐक्याचा अभाव आहे," कसे काबूलमधील एका माजी सरकारी सूत्राने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदीचं 'ते' वक्तव्य तालिबानला चांगलंच झोंबलं; अशी आली प्रतिक्रिया"अफगाणिस्तानात सत्तेवरून प्रचंड वाद सुरू आहेत. विविध जाती आणि जमातींना सत्ता हवी आहे. तालिबानसाठी हा मोठा धक्का आहे," असे सूत्राने सांगितले. हक्कानी नेटवर्ककडे आधीच काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी (प्रभारी म्हणून) देण्यात आली आहे. ते अफगाणिस्तानशी संबंधित राजकीय आणि लष्करीदृष्ट्या पडद्यामागील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे, अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या आणि 50 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस असलेल्या दहशतवाद्यालाच अफगाणिस्तानमधील सुरक्षा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानTerrorismदहशतवादEducationशिक्षणterroristदहशतवादीStudentविद्यार्थी