शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 3:51 PM

यावेळी भारत आणि चिनी परराष्ट्रमंत्र्यांची सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात सहमती झाली, तेव्हा रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी त्याचे श्रेय तत्काळ घेतले.

ठळक मुद्देभारत आणि चीन यांच्यात शांतता प्रस्थापित करतोय रशियाआशियातील मोठी शक्ती म्हणून समोर येण्याचा रशियाचा प्रयत्नभारत-चीन वादावर अमेरिकेपेक्षाही रशियाने अधिक सक्रियता दर्शवली आहे.

मॉस्को - भारत-चीनदरम्यान सुरू असलेल्या वादात आता रशियाने एन्ट्री केली आहे. रशियाच्या या एन्ट्रीमुळे राजकीय पंडितांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारत-चीन वादावर अमेरिकेपेक्षाही रशियाने अधिक सक्रियता दर्शवली आहे. मात्र, शंघाय सहकार्य संघटनेत्या बैठकीत, या प्रकरणात रशिया एवढी सक्रियता का दाखवत आहे अथवा रशियाची नेमकी महत्वकांक्षा काय? हे उघड झाले आहे. 

यावेळी भारत आणि चिनी परराष्ट्रमंत्र्यांची सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात सहमती झाली, तेव्हा रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी त्याचे श्रेय तत्काळ घेतले. तेव्हा, मॉस्कोने चीन आणि भारताला एका व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. याचा उद्देश सीमेवर शांतता प्रस्थापित करणे आहे, असे सर्गेई यांनी म्हटले होते.

भारत आणि चीन यांच्यात शांतता प्रस्थापित करतोय रशिया -साउथ चायना मॉर्निग पोस्टच्या वृत्तानुसार, भारत आणि चीन यांच्यात मॉस्को येथे झालेला शांततेचा करार प्रत्यक्षात किती काळ टिकून राहील? याबाबत तज्ज्ञांना अजूनही शंका आहे. कारण दोन्ही देशांचे सैनिक सीमेवर एकमेकांच्या फायरिंग रेंजमध्ये उभे ठाकले आहेत. मात्र, या माध्यमातून रशिया स्वतःला जागतीक वाद सोडविणाऱ्या देशाच्या रुपात स्वतःला  प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी लावरोव यांनी भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यासोबत फोटोशूटही केले होते.  पुतीन यांचे स्वप्न -रशियाचे हे पाऊल म्हणजे पुन्हा एकदा दक्षिण आशियामध्ये आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न, असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मॉस्को येथील रशियन अकॅडमी ऑफ सायंसेसशी संबंधित एनजीओ IMEMOच्या अॅलेक्सी कुप्रियनोव्ह यांनी म्हटले आहे, की अनेक कारणांच्या माध्यमाने रशिया दक्षीण आशीयात पुन्हा एकदा आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. यांपैकीच एक म्हणजे दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा सक्रिय होणे. या माध्यमाने 1980 आणि 1990च्या दशकात मॉस्कोने गमावलेला प्रभाव पुन्हा एकदा मिळवण्याची रशियाची इच्छा आहे. तर दुसरे कारण अफगाणिस्तानात मिळालेला पराभव विसरणे आहे.

आशियातील मोठी शक्ती म्हणून समोर येण्याचा रशियाचा प्रयत्न -राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे 2000 साली सत्तेवर आले. त्यांनी रशियाच्या कमकुवत स्थितीवर अनेकदा दुःखही व्यक्त केले होते. मात्र, आता रशिया त्यांच्याच नेत्रृत्वात आशिया आणि अफ्रिकेतील गमावलेला प्रभाव पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी पुतीन प्रचंड परिश्रम घेत आहेत. नव्हे, भारत आणि चीन यांच्यात शांतता प्रस्थापित केल्यास आशियात पुन्हा शक्तीशाली होण्याचा मार्ग त्यांना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी रशियाने अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी 11 देशांची बैठक घेतली होती. ही चर्चा यशस्वी झाली होती. यामुळे रशियाला बळ मिळाले होते. या बैठकीत भारताचाही समावेश होता. 

महत्त्वाच्या बातम्या -

धक्कादायक खुलासा : भारतात तब्बल 62 टक्के महिला अ‍ॅप्सच्या माध्यमाने करतात 'सेक्सटिंग'

रशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस

आता लोक स्वतःच करू शकतील स्वतःची कोरोना चाचणी, वैज्ञानिकांनी विकसित केली नवी 'रॅपिड टेस्ट' टेकनिक

"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

टॅग्स :border disputeसीमा वादIndiaभारतchinaचीनrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन