शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

लसीच्या मानवी चाचण्या पूर्ण केल्याचा रशियाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 01:15 IST

आता नोंदणीचे काम सुरू; तिसरा टप्पा वगळल्याची चर्चा

मॉस्को : रशियातील मॉस्को शहरातील गॅमेलिया इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या पूर्ण झाल्या असल्याचे त्या देशाने जाहीर केले आहे. आता या लसीच्या नोंदणीचे काम सुरू आहे असे वृत्त रशियातील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या लसीच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा रशियाने पूर्ण केलेला नाही, अशी शंका जगभरातील शास्त्रज्ञांनी बोलून दाखविली आहे.

ही लस येत्या आॅक्टोबर महिन्यात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे रशियाच्या आरोग्य खात्याने म्हटले आहे. ही लस देशात सर्वप्रथम डॉक्टर व शिक्षकांना टोचली जाईल. मानवी चाचण्यांचे तीनही टप्पे पूर्ण झाले आहेत की, केवळ पहिला व दुसरा टप्पाच पूर्ण झाला आहे, याबद्दल रशियाच्या आरोग्य खात्याने स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. रशियाने बनविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून तिसऱ्या टप्प्याला १३ जुलैपासून सुरुवात होणार असल्याचे तास या वृत्तसंस्थेने म्हटले होते. मानवी चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण होण्यास काही महिने जातात. मात्र, कोरोना साथीने जगभरात घातलेला धुमाकूळ पाहता अनेक देशांनी मानवी चाचण्या जलदगतीने पार पाडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रशियाने ज्या गतीने या लसीच्या चाचण्या पार पाडल्या त्याबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली.अमेरिकेची विरोधी भूमिका...अमेरिकेतील कोरोना प्रतिबंधक कृती गटाचे सदस्य डॉ. अँथनी फौसी यांनीही रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या गुणवत्तेविषयी शंका घेणारे वक्तव्य नुकतेच केले होते. चीननेही एका कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता दिली आहे; पण तिच्याही विश्वासार्हतेविषयी जगभरातील शास्त्रज्ञांना शंका आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशिया