relief to students as trump administration agrees to revoke student visa curbs | खूशखबर! ट्रम्प सरकार न्यायालयात झुकलं, विदेशी विद्यार्थ्यांसंदर्भात घेतला मोठा निर्णय 

खूशखबर! ट्रम्प सरकार न्यायालयात झुकलं, विदेशी विद्यार्थ्यांसंदर्भात घेतला मोठा निर्णय 

ठळक मुद्देट्रम्प सरकारच्या या निर्णयाचा फटका तब्बल 10 लाख विद्यार्थ्यांना बसणार होता.अमेरिकेत राहणाऱ्या हजारो विदेशी विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.ट्रम्प प्रशासनने अमेरिकेत राहून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात परतावे लागेल, असा आदेश दिला होता

न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, विद्यापीठ आणि विदेशातील विद्यार्थ्यांच्या दबावापूढे झुकले आहे. अमेरिकेत राहून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विदेशातील विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याच्या ट्रम्प सरकारच्या निर्णयाला जबरदस्त विरोध झाल्यानंतर, सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. 

ट्रम्प प्रशासन इमिग्रेशन आणि कस्टम विभागाच्या वकिलांनी मंगळवारी न्यायालयात सांगितले, की या सुनावण्यांची आता आवश्यकता नाही. कारण आम्ही विदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसासंदर्भात घेतलेला निर्णय मागे घेण्यास तयार आहोत. अमेरिकेत राहणाऱ्या हजारो विदेशी विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.

ट्रम्प प्रशासनने गेल्या आठवड्यात, अमेरिकेत राहून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात परतावे लागेल, असा आदेश दिला होता. यासाठी ट्रम्प प्रशासनाने कोरोना संक्रमणाचे कारण सांगितले होते. तसेच ऑनलाइन शिक्षणासाठी अमेरित राहण्याची आवश्यकता नाही, असेही म्हटले होते. एवढेच नाही, तर अशा सर्व विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्याचेही आदेश ट्रम्प सरकारने दिले होते. मात्र, याला प्रचंड विरोध झाला. जॉन हॉप्किन्स युनिव्हर्सिटी, हार्वर्ड, एमआयटी युनिव्हर्सिटी आदींनी बुधवारी या निर्णयाविरोध न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

दबावात आल्याने सरकारने निर्णय बदलला -
न्यायालयात सुनावणीदरम्यान ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय मागे घेण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. जस्टिस एलीसन बरोज सुनावणीदरम्यान म्हणाले, 'सरकारने आपला जुना निर्णय बदलला आहे. तसेच त्या निर्णयावर सुरू असलेली कारवाई स्थगित करण्यावरही सहमती दर्शवली आहे.' 

10 लाख विद्यार्थ्यांना बसणार होता फटका -
ट्रम्प सरकारने विद्यापीठांवर ऑनलाइन कोर्सेस सुरू करण्यासाटी दबाव टाकला होता. यानंतर काही कोर्सेस ऑनलाइनदेखील सुरू झाले. यानंतर त्यांनी, या विद्यार्थ्यांनी परत आपल्या देशात जाण्याचे फरमान सोडले होते. त्यांच्या या निर्णयाचा फटका तब्बल 10 लाख विद्यार्थ्यांना बसणार होता.

महत्त्वाच्या बातम्या -

छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना भडकली; म्हणाली…

कुणी म्हणे थायलंड, कुणी अफगाणिस्तान... 'खऱ्या अयोध्ये'चे दावे वाचून व्हाल हैराण

गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात

"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"

"26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री...; सचिन पायलटांना काय दिलं नाही"

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

English summary :
Relief to students as trump administration agrees to revoke student visa curbs.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: relief to students as trump administration agrees to revoke student visa curbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.