there should be strict laws against making fun national heroes says kangana ranaut | छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना भडकली; म्हणाली…

छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना भडकली; म्हणाली…

ठळक मुद्देस्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिने काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.हा वाद शांत झालेला नाही. त्यावर अजूनही प्रतिक्रिया येत आहेत.याच प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली होती.

मुंबई - स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिने काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. यावर तिने माफिनामाही दिला. मात्र, अद्यापही हा वाद शांत झालेला नाही. त्यावर अजूनही प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही प्रतिक्रिया दिली आहे. 

अभिनेत्री कंगना रणौत हिचे म्हणणे मांडणाऱ्या टीम कंगना रणौत या ट्विटर हॅण्डलवर, या सर्व प्रकारावर पोस्ट केलेल्या एका उपहासात्मक व्हिडिओसोबत कमेंट करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा संदर्भ देत कॉमेडियन्सवर भाष्य करण्यात आले आहे. यासंदर्भात कंगनाने म्हटले आहे, “ज्यांना दोन पैशांचीही किंमत नाही, ज्यांना कुणी विचारतही नाही, असे लोकं हुतात्म्यांवर विनोद करतात, हे योग्य नाही. कुणीही हुतात्म्यांवर विनोद करू नयेत. आपल्या देशांतील हिरोंसंदर्भात विनोद करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात कायदे असणे आवश्यक आहे.

तत्पूर्वी, कॉमेडिअन जोशुआने झालेल्या प्रकारासंदर्भात माफी मागितल्यानंतर तिला थेट बलात्काराची धमकी देण्यात आली होती. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हिडिओ शुभम मिश्रा नावाच्या तरुणाने पोस्ट केला होता. यानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही या तरुणाला अटक करण्याची मागणी केली. होती. यानंतर त्याला वडोदरा पोलिसांनी अटकही केली. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियन जोशुआवर कारवाई करण्यात यावी अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मिडियावर येत आहेत.

याच प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली होती. यासंदर्भात मनसेचे कार्यकर्ते यश रानडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर जोशुआचा स्टुडिओत तोडफोड केल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये अग्रिमा जोशुआ हिने लेखी माफी मागितल्याचेही सांगण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या -

कुणी म्हणे थायलंड, कुणी अफगाणिस्तान... 'खऱ्या अयोध्ये'चे दावे वाचून व्हाल हैराण

गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात

"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"

"26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री...; सचिन पायलटांना काय दिलं नाही"

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

English summary :
There should be strict laws against making fun national heroes says kangana ranaut.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: there should be strict laws against making fun national heroes says kangana ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.