sachin pilot dismissed from deputy cm post congress says party give him a lot a short age | "26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री...; सचिन पायलटांना काय दिलं नाही"

"26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री...; सचिन पायलटांना काय दिलं नाही"

ठळक मुद्दे काँग्रेसच्या हाय कमांडने राजेश पायलट यांच्याशी अर्धाडझन वेळा संवाद साधला.सीडब्ल्यूसीच्या दोन सदस्यांनीही अनेक वेळा पायलट यांच्याशी संवाद साधला.काँग्रेसने फार कमी वयात पायलटांना दिल्या होत्या मोठ्या जबाबदाऱ्या.


नवी दिल्ली -राजस्थानातकाँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हातात घेत, राजस्थानातील गेहलोत सरकारलाच आव्हान दिले होते. यामुळे काँग्रेसने त्यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरू आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर कांग्रेसचे माध्यम प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी यासंदर्भात घोषणा केली. पायलटांवर केलेल्या कारवाईची माहिती देताना, सुरजेवाला यांनी पायलट यांना पक्षाने अगदी कमी वयात खूप काही दिले होते. याचीही आठवण करून दिली.

जयपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विधीमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले, ''आम्हाला एका गोष्टीचे दुःख आहे, की उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काही आमदार आणि मंत्री भ्रमित होऊन भाजपाच्या षडयंत्रात अडकले आणि काँग्रेस सरकार पाडण्यासाठी तयार झाले.''

सुरजेवाला म्हणाले, ''सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सचिन पायलट आणि इतर सहकारी मंत्री आणि आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या हाय कमांडने राजेश पायलट यांच्याशी अर्धाडझन वेळा संवाद साधला. सीडब्ल्यूसीच्या दोन सदस्यांनीही अनेक वेळा पायलट यांच्याशी संवाद साधला. केसी वेणुगोपाल यांनीही त्यांच्याशी चर्चा केली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावतीने आम्हीही त्यांना आवाहन केले, की सर्व दरवाजे खुले आहेत. जर तुमचे काही मतभेत असतील, तर ते काँग्रेस नेतृत्वाला सांगा, आपण बसून ते सोजवू.''

कमी वयात दिल्या मोठ्या जबाबदाऱ्या -
सचिन पायलट यांना काँग्रेसने कमी वयात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. ''सचिन पायलट यांना अगदी कमी वयात जी राजकीय ताकद दिली गेली, तेवढी तागद कदाचित कुणालाही दिली गेली नसेल. 2003 मध्ये सचिन पायलट राजकारणात आले. यानंतर 26 वर्षांचे असतानाच 2004 मध्ये त्यांना काँग्रेसने खासदार बनवले. 32 वर्षांचे असताना त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले. 34 वर्षांचे असतानाच त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची दबाबदारी दिली गेली. 40 व्या वर्षी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा आशिर्वाद सदैव त्यांच्यासोबत होता. यामुळेच त्यांना हे सर्व मिळाले,'' असेही रणदीप सिंह सुरजेवाला यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या -

सचिन पायलटांनी काँग्रेससमोर ठेवल्या 'तीन' मोठ्या मागण्या; जाणून घ्या

CoronaVirus : आता बायोकॉन आणणार कोरोना रुग्णांसाठी औषध, किंमत बघून व्हाल हैराण

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

CoronaVirus : खूशखबर! कोरोना व्हॅक्‍सीनवर रशियानं मारली 'बाजी'; सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा, सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वी

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

English summary :
Sachin pilot dismissed from deputy cm post Congress says party give him a lot a short age.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sachin pilot dismissed from deputy cm post congress says party give him a lot a short age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.