शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

व्हिस्कॉन्सिनमध्ये ट्रम्प, हिलरींना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 04:07 IST

व्हिस्कॉन्सिन राज्यातील प्राथमिक निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे टेड क्रूज आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे बर्नी सँडर्स यांनी त्यांचे तगडे प्रतिस्पर्धी अनुक्रमे डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन

मिल्वाउकी : व्हिस्कॉन्सिन राज्यातील प्राथमिक निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे टेड क्रूज आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे बर्नी सँडर्स यांनी त्यांचे तगडे प्रतिस्पर्धी अनुक्रमे डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांना बुधवारी पराभवाची धूळ चारली. हा विजय क्रूज व सँडर्स यांच्यासाठी पक्षाची उमेदवारी मिळविण्याच्या लढाईतील टर्निंग पॉईंट ठरला आहे. अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीसाठी रिपब्लिकन व डेमोक्रॅ्रटिक पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे ट्रम्प व हिलरी आघाडीवर आहेत. तथापि, व्हिस्कॉन्सिनमध्ये त्यांना क्रूज व सँडर्स यांच्याकडून मात मिळाली. ट्रम्प यांना ३५.१ टक्के मते प्राप्त झाली, तर क्रूज यांना ४८.३ टक्के मतदारांचा पाठिंबा मिळाला. जॉन कॅसिच तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यांच्या बाजूने रिपब्लिकनच्या १४ टक्के मतदारांनी कौल दिला. दुसरीकडे सँडर्स यांनी ५६.५ टक्के मते मिळवत डेमोक्रॅटिकची व्हिस्कॉन्सिनमधील प्राथमिक निवडणूक जिंकली आहे. हिलरी यांना ४३.१ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. सँडर्स यांनी अलीकडे हिलरी यांच्या विरुद्ध मिळविलेला हा सलग सहावा विजय आहे. (वृत्तसंस्था)