शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव मुखर्जींच्या भेटीने द्विपक्षीय संबंध दृढ होतील

By admin | Updated: October 8, 2015 01:51 IST

भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुढील आठवड्यातील प्रस्तावित इस्रायल भेटीमुळे दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, अशा भावना इस्रायलमध्ये व्यक्त होत आहेत.

जेरुसलेम : भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुढील आठवड्यातील प्रस्तावित इस्रायल भेटीमुळे दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, अशा भावना इस्रायलमध्ये व्यक्त होत आहेत. ही भेट म्हणजे द्विपक्षीय संबंधांतील ऐतिहासिक मैलाचा दगड, असे वर्णन केले जात आहे. इस्रायलच्या भेटीवर जाणारे ते पहिले भारतीय राष्ट्रपती ठरणार आहेत. भारताच्या राष्ट्रपतींच्या भेटीमुळे अर्थकारण, विज्ञान, औषधशास्त्र आणि कृषी अशा सर्व क्षेत्रांतील दोन्ही देशांचे संबंध वाढीस लागतील, असे मत इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियुवेन रिवलिन यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सहा दिवसांच्या मध्यपूर्वेच्या भेटीस जात आहेत. त्यामध्ये १३ आॅक्टो. ते १५ आॅक्टो. हा काळ ते इस्रायलच्या दौऱ्यावर असतील. इस्रायलबरोबर ते जॉर्डन आणि रामल्लासही भेट देणार आहेत. राष्ट्रपतींची भेट अत्यंत महत्त्वाची आहे. या भेटीमध्ये ते इस्रायलची संसद नेसेटलाही संबोधित करणार आहेत. नेसेटला संबोधित करण्याचा मान अत्यंत मोजक्या नेत्यांना मिळाला आहे, त्यामध्ये आता मुखर्जी यांचा समावेश होईल. त्याचप्रमाणे जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठातर्फे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा डॉक्टरेट पदवीने सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या शिष्टमंडळात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह सहा खासदारांचा समावेश असेल.भारत-इस्रायल संबंध! भेटीचे राजकीय महत्त्व : राष्ट्रपती या भेटीत इस्रायलचे राष्ट्रपती रियुवेन रिवलिन यांच्यासह पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू, संसद नेसेटचे सभापती युली एडेलस्टेन, विरोधी पक्षनेते आयझॅक हरझॉग यांची भेट घेणार आहेत. 1992 साली भारत व इस्रायल यांच्यामध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित झाले. 2000 साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी इस्रायलला भेट दिली.2003 साली इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांनी भारतास भेट दिली.त्यानंतर अनेक भारतीय नेत्यांनी इस्रायलला भेट दिली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना नरेंद्र मोदी यांनीही इस्रायलला भेट दिली आहे. मागील वर्षी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही जेरुसलेमला भेट दिली होती. मात्र, अद्याप भारताच्या पंतप्रधानपदी व राष्ट्रपतीपदी असणाऱ्या व्यक्तीने इस्रायलला भेट दिलेली नाही.त्यामुळे प्रणव मुखर्जी हे इस्रायलला जाणारे पहिले भारतीय राष्ट्रपती ठरणार आहेत. इस्रायल आणि भारताचे सध्या शेती, तंत्रज्ञान, औषध, संरक्षण सामुग्री अशा विविध क्षेत्रांमध्ये संबंध प्रस्थापित झालेले आहेत. संयुुक्त राष्ट्रच्या आमसभेवेळेस न्यूयॉर्क येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी एकमेकांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती.