शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या एमक्यूएम बंडखोरांना भारताची साथ ?

By admin | Updated: June 26, 2015 10:32 IST

किस्तानमधील मुत्तहिदा कौमी मुव्हमेंटला (एमक्यूएम) भारताच्या गुप्तचर यंत्रणेने पाठबळ असून या पक्षातील बंडखोरांना भारताने शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याचा दावा केला जात आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २६ - पाकिस्तानमधील मुत्तहिदा कौमी मुव्हमेंटला (एमक्यूएम) भारताच्या गुप्तचर यंत्रणेने पाठबळ असून या पक्षातील बंडखोरांना भारताने शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याचा दावा केला जात आहे. भारतान या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले असले पाकिस्तानने यासंदर्भात ब्रिटन पोलिसांकडून माहिती मागवली आहे. 
पाकिस्तानमधील मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट या राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ब्रिटन पोलिसांनी अटक केली होती. या दोघांची चौकशी दरम्यान भारतात प्रशिक्षण घेतल्याची व भारताकडून वेळोवेळी मदत मिळत असल्याची कबुली दिल्याचे वृत्त बीबीसी या आंतरराष्ट्रीय वाहिनीने दिले आहे. या वृत्तामुळे पाकिस्तानने भारताची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याप्रकरणी पाकच गृहमंत्री निसार अली खान यांनी ब्रिटनचे पाकमधील उच्चायुक्त फिलिप बार्टन यांची भेट घेत ब्रिटन पोलिसांकडून सविस्तर माहिती मागवण्याची विनंती केली. आम्ही यापूर्वीही मुत्तहिदांना भारताची साथ असल्याचे सांगितले होते, पण आता बीबीसीच्या वृत्ताने आमच्या दाव्यांना पाठबळ मिळाले आहे असे त्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले. तर भारत व एमक्यूएमच्या प्रवक्त्यांनी बीबीसीच्या वृत्तात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. 
 
मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचे भारत कनेक्शन 
एमक्यूएम म्हणजे कराचीत राहणा-या मुजाहिर समाजाचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष. मुहाजीर समुदाय हा फाळणीनंतर पाकमध्ये स्थलांतरित झाला. मात्र त्यांचे भारताशी अजूनही घट्ट नाते आहे. या समाजाला सिंध प्रातांत स्वतंत्र राज्य हवे आहे. यासाठी या पक्षातर्फे वेळोवेळी आंदोलन करण्यात आले होते. तसेच भारताने आम्हाला मदत करावी अशी जाहीर मागणी पक्षाचे अध्यक्ष अल्ताफ हुसैन यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. पाक सैन्याची नजर असलेल्या अल्ताफ हुसैन हे ब्रिटनमधून पक्ष चालवतात.