पाकिस्तानने केला टीव्ही वाहिनीचा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 04:24 IST2016-11-02T04:24:24+5:302016-11-02T04:24:24+5:30

हिंदी भाषेत डब केलेली व्यंगचित्रे दाखवल्याबद्दल पाकिस्तानने अमेरिकेतील निकोएलोदेआॅन या वाहिनीचा परवाना निलंबित केला.

Pakistan suspended TV channel license | पाकिस्तानने केला टीव्ही वाहिनीचा परवाना निलंबित

पाकिस्तानने केला टीव्ही वाहिनीचा परवाना निलंबित


इस्लामाबाद : हिंदी भाषेत डब केलेली व्यंगचित्रे दाखवल्याबद्दल पाकिस्तानने अमेरिकेतील निकोएलोदेआॅन या वाहिनीचा परवाना निलंबित केला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावात वाढ झाल्यानंतर पाकिस्तानने भारतीय दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीच्या प्रसारणावर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानच्या प्रसारमाध्यम नियामक प्राधिकरणने (पीएमआरए) वाहिनीचा परवाना निलंबित केला.
निकएलोदेआॅनने पाकिस्तानच्या प्रसार माध्यम नियामक प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तिचा परवाना निलंबित करण्याचे इलेक्ट्रॉनिक मीडिया वॉचडॉगने सोमवारी जाहीर केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Pakistan suspended TV channel license