शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 23:02 IST

पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी हे विमानातून उतरत असताना दुबईत त्यांचा अपघात झाला.

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानातून उतरताना पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचा अपघात झाला आहे,त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले. बुधवारी रात्री ही घटना घडली, मात्र गुरुवारी (३१ ऑक्टोबर) रात्री उशिरा त्यांच्या कार्यालयाने याची माहिती दिली.

राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पडल्यानंतर आसिफ अली झरदारी यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांच्या पायाला प्लास्टर लावले. चार आठवडे त्यांच्या पायावर प्लास्टर राहील, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, अध्यक्ष झरदारी यांना घरी पाठवण्यात आले असून त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

६९ वर्षीय आसिफ अली झरदारी यांना अलिकडच्या वर्षांत अनेक आरोग्यविषयक अडचणी आल्या.  संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली. २०२२ मध्ये, छातीच्या संसर्गाच्या उपचारांसाठी त्यांना कराचीतील डॉक्टर झियाउद्दीन रुग्णालयात आठवडाभर दाखल करण्यात आले होते. त्या काळात प्रकृती अस्वास्थ्याच्या अफवांदरम्यान, त्यांचे वैयक्तिक चिकित्सक आणि जवळचे सहकारी डॉ असीम हुसेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पुष्टी केली की त्यांची प्रकृती चांगली आहे.