अफगाणिस्तानवरील एअर स्ट्राईकमध्ये ८० दहशतवादी ठार, पाकिस्तानचा दावा; तालिबान घेणार बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:00 IST2026-02-23T12:59:34+5:302026-02-23T13:00:09+5:30

पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात केलेल्या मोठ्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

pakistan airstrike ttp terrorists killed afghanistan threat revenge | अफगाणिस्तानवरील एअर स्ट्राईकमध्ये ८० दहशतवादी ठार, पाकिस्तानचा दावा; तालिबान घेणार बदला

अफगाणिस्तानवरील एअर स्ट्राईकमध्ये ८० दहशतवादी ठार, पाकिस्तानचा दावा; तालिबान घेणार बदला

पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात केलेल्या मोठ्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. या हल्ल्यात 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) या दहशतवादी संघटनेचे किमान ८० दहशतवादी मारले गेल्याचा मोठा दावा पाकिस्तानने केला आहे.

अफगाणिस्तानच्या सत्तेवर असलेल्या तालिबान सरकारने या हल्ल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तालिबानने पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिला असून, या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, "काल रात्री पाकिस्तानच्या गुप्तचर माहितीच्या आधारे नांगरहार, पक्तिका आणि खोस्त प्रांतांमध्ये 'फितना अल-ख्वारिज' (TTP) च्या सात केंद्रांवर एअरस्ट्राइक करून ती उद्ध्वस्त करण्यात आली. यात ८० पेक्षा जास्त लोक मारले गेले असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे."

"एअर स्ट्राईकचा बदला घेऊ"; १९ जणांच्या मृत्यूमुळे अफगाणिस्तान आक्रमक, पाकिस्तानला थेट इशारा

तालिबान सरकारने हे हल्ले आपल्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल आणि पाकिस्तानला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असं तालिबानने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने नांगरहार आणि पक्तिका या सीमावर्ती प्रांतांमध्ये झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. मंत्रालयाने म्हटलं आहे की, "नागरी वस्त्या आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य केल्याबद्दल आम्ही पाकिस्तानी सैन्याला जबाबदार धरतो. आम्ही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देऊ."

अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर पाकिस्तानचा एअर स्ट्राईक; दहशतवादी तळांना लक्ष्य, १९ जणांचा मृत्यू

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वादाचं सर्वात मोठं कारण 'टीटीपी' (TTP) ही दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तानचं म्हणणं आहे की, २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार आल्यापासून पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या मते, टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानात लपलेले असून तिथलं सरकार त्यांना संरक्षण देत आहे.

अफगाणिस्तानचे तालिबान सरकार मात्र हे आरोप फेटाळून लावत आहे. आपल्या जमिनीचा वापर दुसऱ्या कोणत्याही देशाविरुद्ध होऊ दिला जात नाही, असा त्यांचा दावा आहे. पाकिस्तानच्या सुरक्षेतील त्रुटी ही त्यांची अंतर्गत समस्या असून, त्याचा अफगाणिस्तानशी काहीही संबंध नाही, असा युक्तिवाद तालिबानकडून केला जात आहे.

Web Title : पाकिस्तान के हवाई हमले में 80 आतंकवादी ढेर; तालिबान ने बदला लेने की कसम खाई

Web Summary : अफगानिस्तान में पाकिस्तान के हवाई हमले में 80 टीटीपी आतंकवादी मारे गए, जिससे तनाव बढ़ गया। तालिबान सरकार ने हमले की निंदा की, जवाबी कार्रवाई की धमकी दी और संप्रभुता के उल्लंघन का दावा किया। पाकिस्तान का दावा है कि टीटीपी हमलों के लिए अफगान क्षेत्र का उपयोग करता है, तालिबान ने इस आरोप का खंडन किया, आंतरिक सुरक्षा मुद्दों का हवाला दिया।

Web Title : Pakistan Airstrike Kills 80 Terrorists; Taliban Vows Revenge

Web Summary : Pakistan's airstrike in Afghanistan killed 80 TTP terrorists, escalating tensions. The Taliban government condemned the attack, threatening retaliation and asserting sovereignty violations. Pakistan claims TTP uses Afghan territory for attacks, a charge the Taliban denies, citing internal security issues.