अफगाणिस्तानता परतला ओसामा बिन लादेनचा विश्वासू अमीन उल हक, Video आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 07:13 PM2021-08-30T19:13:26+5:302021-08-30T19:15:07+5:30

Afghanistan Crisis: अमीन उल हक तोरा-बोरामध्ये ओसामा बिन लादेनचा सुरक्षा प्रमुख होता.

Osama bin Laden's confidant Amin ul Haq returns to Afghanistan, video viral | अफगाणिस्तानता परतला ओसामा बिन लादेनचा विश्वासू अमीन उल हक, Video आला समोर

अफगाणिस्तानता परतला ओसामा बिन लादेनचा विश्वासू अमीन उल हक, Video आला समोर

googlenewsNext

काबुल:अफगाणिस्तानतातालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर तेथे पूर्वीप्रमाणे दहशतवाद्यांचा अड्डा तयार होईल अशी भीती वर्तवण्यात येत आहे. यातच आता अमेरिकेतील 9/11 च्या घटनेस जबाबदार असलेल्या 'अल कायदा' या दहशतवादी संघठनेचा प्रमुख नेता अमीन-उल-हक अफगाणिस्तानात परतला आहे. तो आपल्या मूळ नांगरहार प्रांतात परतल्याचा एक व्हिडिओ अफगाणिस्तानातील पत्रकार बिलाल सरवारी यांनी शेअर करून ही माहिती दिली.

ओसामाचा सुरक्षा प्रमुख होता अमीन 

मिळालेल्या माहितीनुसार, अमीन-उल-हक तोरा बोरा येथे कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा सुरक्षा प्रमख होता. डॉ अमीन 1980 च्या दशकात मक्ताबा अखिदमत येथे काम करत असताना लादेनच्या जवळ आला. तो लादेनच्या अगदी जवळच्या व्यक्तींपैकी एक होता.

15 ऑगस्ट रोजी काबुलवर कब्जा 

तालिबाननं 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा केला. तेव्हापासून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि भारतासह जगातील सर्व देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात गुंतले आहेत. दरम्यान, तालिबाननं अमेरिकेला 31 ऑगस्टपर्यंत आपलं सैन्य मागे घेण्याचा अल्टीमेटम दिला आहे.

Web Title: Osama bin Laden's confidant Amin ul Haq returns to Afghanistan, video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.