शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रशियाच्या वेटलिफ्टर्सवर आॅलिम्पिक बंदी?

By admin | Updated: June 23, 2016 18:54 IST

रशियाच्या वेटलिफ्टर्सकडून वारंवार डोपिंग नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे त्यांना रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागापासून वंचित ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे

ऑनलाइन लोकमत

पॅरिस, दि. 23 - रशियाच्या वेटलिफ्टर्सकडून वारंवार डोपिंग नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे त्यांना रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागापासून वंचित ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे. रशियाच्या अ‍ॅथ्लीटस्ना आॅगस्टमध्ये रिओत होणाऱ्या आॅलिम्पिकपासून दूर ठेवण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने देखील हा बंदीचा निर्णय कायम ठेवला. आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने असाच निर्णय घेतल्याने रशियाच्या क्रीडा क्षेत्रावर संकट कोसळले आहे. भारोत्तोलनातील सर्वोच्च संस्थेने रशिया, कझाखस्तान आणि बेलारुसच्या खेळाडूंचे २००८ तसेच २०१२ च्या आॅलिम्पिकमधील चाचणीचे नमुने फेरपरीक्षणासाठी ताब्यात घेतले होते. हे नमुने पॉझिटिव्ह येताच खेळाडूंचे भविष्य धोक्यात आले आहे.पॉझिटिव्ह खेळाडूंना वर्षभर बंदीला सामोरे जावे लागेल. उत्तर कोरियाचे खेळाडू आधीच डोपिंगच्या आरोपात बंदीचा समना करीत आहेत. भारोत्तोलन महासंघ या खेळाला डोपिंगमुक्त करण्याच्या प्रयत्नात असताना काही देशांच्या खेळाडूंनी मात्र महासंघाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. ज्या देशांच्या खेळाडूंची चाचणी अपयशी ठरते त्या देशावर वर्षभराची बंदी लावण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय महासंघाने घेतला. खेळाडूंच्या दुसऱ्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला किंवा नाही, याची खात्री झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती बंदीबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे.