शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

आता 'एआय'चे शस्त्र; बनावट व्हिडीओंद्वारे मानसिक खच्चीकरणाचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 04:21 IST

लढाईत गुंतलेले देश त्यांच्या शत्रू देशाविरोधात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. इराण, इस्रायलमध्ये झालेले हल्ले व त्यांचे एआयने दाखविलेले बनावट रूप यातून वेगळेच प्रचारयुद्ध खेळले जात असून, त्यातून शत्रूचे मानसिक धैर्य खच्चीकरणाचे प्रयत्न केले जात आहेत. 

दुबई : इराण, इस्रायल आणि काही आखाती देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यांनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात छायाचित्रे आणि व्हिडिओंचा पूर आला आहे. त्यात एआयद्वारे निर्मित बनावट व्हिडिओ, छायाचित्रांचा समावेश आहे.

  लढाईत गुंतलेले देश त्यांच्या शत्रू देशाविरोधात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. इराण, इस्रायलमध्ये झालेले हल्ले व त्यांचे एआयने दाखविलेले बनावट रूप यातून वेगळेच प्रचारयुद्ध खेळले जात असून, त्यातून शत्रूचे मानसिक धैर्य खच्चीकरणाचे प्रयत्न केले जात आहेत. 

इराकमधील विमानतळावर झालेल्या प्रचंड स्फोटाचे म्हणून दाखवलेले चित्र एआयने तयार केलेले होते. गुगल अर्थवरील उपग्रह प्रतिमांमध्ये फेरफार करून अमेरिकन नौदल तळाचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. कुवेतच्या लष्कराने केलेल्या गोळीबारात अमेरिकेची तीन लढाऊ विमाने चुकून पाडण्यात आली. ड्रोन हल्ल्यानंतर सौदी अरेबियातील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला आग लागली होती. अबुधाबी येथे फ्रेंच नौदल तळावर लागलेली आग घटनांचे व्हिडीओदेखील विविध माध्यमांनी तपासले आहेत. या घटनांचे खोटे व्हिडीओ प्रसारित झाले आहेत का, याची तपासणी केली आहे. 

अणुऊर्जा केंद्रात स्फोट, व्हिडीओ गेममधील दृश्य...
इस्रायलमधील अणुऊर्जा केंद्रात स्फोट झाल्याचा दावा करणारी एक पोस्ट प्रत्यक्षात २०१७मधील युक्रेनमधील व्हिडीओ आहे. इराणी विमानाच्या हल्ल्याचा दावा करणारा दुसरा व्हिडीओ हा प्रत्यक्षात व्हिडीओ गेममधील दृश्य आहे. तेल अवीववरील हल्ला असल्याचा दावा करणारा आणखी एक व्हिडीओ २०१५मधील चीनमधील रासायनिक गोदामातील स्फोटाचा आहे. 

सोशल मीडियावरील युद्धनिगडित व्हिडीओंची होते तपासणी
दुबईवर इराणी लढाऊ विमानांनी हल्ला केल्याचा दावा करणाऱ्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीच्या हाताला पाचपेक्षा अधिक बोटे असल्याचे आढळले. हे लक्षात आल्यावर त्या व्हिडीओची तपासणी केली असता तो एआय टूलने तयार असल्याचे सिद्ध झाले. काही एआय-निर्मित व्हिडीओंवर वॉटरमार्क असतात, ज्यामुळे ते खरे की खोटे हे ओळखण्यास मदत होते. मात्र, ऑनलाइन शेअर केल्यानंतर हे वॉटरमार्क सहज पुसता येतात.
 

English
हिंदी सारांश
Web Title : AI weapons: Fake videos used for psychological warfare, demoralizing enemies.

Web Summary : AI-generated fake videos and images flood social media amid Middle East conflicts. These deceptive visuals aim to mislead and demoralize enemies. Examples include fabricated explosions and manipulated satellite images, highlighting the dangerous use of AI in modern warfare propaganda.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध