शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 10:23 IST

ही घटना लॉस एंजेलिसमधील वेस्टवुड भागातील विलशायर फेडरल बिल्डिंग बाहेर घडली. येथे इराण सरकारविरोधात निदर्शन सुरू होते. या हल्ल्यात दोन निदर्शक जखमी झाल्याचे समजते.  

इराणच्या राजेशाही विरोधातील संघटना मुजाहिदीन-ए-खल्क (MEK) चे स्टिकर असलेला एक यू-हॉल ट्रक अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये रजा पहलवी यांच्या समर्थनार्थ  आणि खामेनेई यांच्या विरोधात सुरू असलेल्या रॅलील घुसला आणि बघता-बघता निदर्शकांना चिरडून गेला. संबंधित ट्रकवर 'No Shah' म्हणजेच 'शाह नकोत', असे लिहिले होते.

ही घटना लॉस एंजेलिसमधील वेस्टवुड भागातील विलशायर फेडरल बिल्डिंग बाहेर घडली. येथे इराण सरकारविरोधात निदर्शन सुरू होते. या हल्ल्यात दोन निदर्शक जखमी झाल्याचे समजते.  

सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इराणमध्ये सुरू असलेल्या जनआंदोलनांच्या समर्थनार्थ, अमेरिकेत एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी हजारो नागरिक सहभागी झाले होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजता या रॅलीला सुरुवात होणार होती. या ट्रकवर “No Regime”, “America Don’t Repeat 1953”, “No Mullah” असा राजकीय संदेश लिहिलेला होता. हे घोषवाक्य १९५३ सालची आठवण करून देते. तेव्हा इराणचे तत्कालीन पंतप्रधान मोसाद्देक यांना हटवून अमेरिकेने शाह यांना पुन्हा सत्तेवर बसवले होते. 

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घटनेनंतर पोलिसांनी यू-हॉल ट्रकमधून एकाला ताब्यात घेतले आहे.  पोलीस त्याला तेथून घेऊन जात असताना संतप्त  आंदोलकांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर झेंड्याला असलेल्या काठ्यांनीही मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Truck rams anti-Khamenei rally in Los Angeles, injures protestors.

Web Summary : A U-Haul truck with anti-Shah slogans drove into a Los Angeles rally supporting Iranian royalty and opposing Khamenei, injuring two protestors. The truck displayed messages criticizing US involvement in past Iranian politics. Police arrested the driver as protestors attempted to confront him.
टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाIranइराण