न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या बाळाची इतिहासात नोंद, डॉक्टरही झाले हैराण; असं काय आहे त्याच्यात खास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 10:12 IST2026-03-03T10:10:26+5:302026-03-03T10:12:47+5:30
Worlds Heaviest Baby: न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या एका बाळाने संपूर्ण हॉस्पिटलसह संपूर्ण जगाला थक्क केले आहे. ३१ जानेवारी रोजी इथाका येथील कायुगा मेडिकल सेंटरमध्ये 'शॉन ज्युनियर' नावाच्या एका बाळाचा जन्म झाला, ज्याचे वजन पाहून अनुभवी डॉक्टरांच्याही भुवया उंचावल्या.

न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या बाळाची इतिहासात नोंद, डॉक्टरही झाले हैराण; असं काय आहे त्याच्यात खास?
न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या एका बाळाने संपूर्ण हॉस्पिटलसह संपूर्ण जगाला थक्क केले आहे. ३१ जानेवारी रोजी इथाका येथील कायुगा मेडिकल सेंटरमध्ये 'शॉन ज्युनियर' नावाच्या एका बाळाचा जन्म झाला, ज्याचे वजन पाहून अनुभवी डॉक्टरांच्याही भुवया उंचावल्या. या बाळाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
टेरिका आणि शॉन या दाम्पत्याने शॉन ज्युनियर नावाच्या मुलाला जन्म दिला. जन्माच्या वेळी शॉन ज्युनियरचे वजन तब्बल ५.९ किलोग्रॅम इतके भरले. सामान्यतः एका नवजात बाळाचे सरासरी वजन २.५ ते ३.५ किलोच्या दरम्यान असते. मात्र, शॉनचे वजन या सरासरीच्या दुप्पट आहे. कायुगा मेडिकल सेंटरच्या रेकॉर्डनुसार, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेले हे आतापर्यंतचे सर्वात वजनदार बाळ ठरले.
चार मुलांची आई असलेल्या टेरिकाला बाळ थोडे जड असेल याची कल्पना होती, पण हा आकडा इतका मोठा असेल असे तिला वाटले नव्हते. आपली प्रतिक्रिया देताना ती मिश्किलपणे म्हणाली की, बाळाला पाहिल्यावर मला असं वाटलं की जणू मी ३ महिन्यांच्या बाळालाच जन्म दिला आहे. त्याला आतापासूनच ३ ते ६ महिने वयोगटातील मुलांचे कपडे आणि डायपर वापरावे लागत आहेत."
सोशल मीडियावर चर्चा
शॉन ज्युनियरचे फोटो व्हायरल होताच इंटरनेटवर प्रतिकियांचा पाऊस पडला आहे. काहींनी त्याला "छोटा बाहुबली" म्हटले आहे, तर काहींनी त्याचा उल्लेख ज्युनिअर रेसलर असा केला आहे. सध्या हे बाळ आणि त्याची आई दोघेही सुखरूप असून, या आगळ्यावेगळ्या विक्रमामुळे हे कुटुंब सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
इतिहासातील सर्वात वजनदार बाळ
जगातील आतापर्यंतच्या सर्वात वजनदार बाळाचा जन्म १९ जानेवारी १८७९ रोजी अमेरिकेतील ओहायो येथे झाला होता. या बाळाचे वजन सुमारे ९.९८ किलोग्रॅम म्हणजे जवळपास २२ पौंड इतके होते. तर, त्याची उंची २८ इंच (७१.१२) इतकी होती. दुर्दैवाने, हे बाळ जन्मानंतर केवळ ११ तासानंतर दगावले.