शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी पाकिस्तानसाठी मोठा धोका - मुशर्रफ

By admin | Updated: October 22, 2014 18:46 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानसाठी मोठा धोका असून नवाझ शरीफ त्यांचा सामना करण्यात कमी पडत असल्याची टीका पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. २३ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानसाठी मोठा धोका असून नवाझ शरीफ त्यांचा सामना करण्यात कमी पडत असल्याची टीका पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सदर वक्तव्य करतानाच आपण कुठल्याही स्थितीत पाकिस्तान सोडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याच मुलाखतीत मुशर्रफ यांनी अण्वस्त्रांचाही उल्लेख केला असून भारतविरोधी युद्धाची भूमिका घेत पाकिस्तानच्या राजकीय पटलावर पुन्हा चर्चेत येण्याचा प्रयत्न मुशर्रफ यांनी केला आहे.
या मुलाखतीदरम्यान मोदींवर कडाडून टीका करतानाच वाजपेयींनी पाळलेली लक्ष्मणरेखा मोदी ओलांडत असून त्यांच्या सर्व भाषणांमधून पाकिस्तानविरोध स्पष्ट दिसतो. शांततेप्रकियेसंबंधी मोदी गंभीर नसून त्यांनी त्यांची भूमिका बदलणे गरजेचे आहे. ते त्यांच्या अटी पाकिस्तानवर लादू शकत नाहीत, असेही ते म्हणाले
भारत बलुचिस्तानात पाकिस्तानविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करत मुशर्रफ यांनी पाकिस्तानही याला जोरदार प्रत्युत्तर काश्मिरमध्ये कारवाया करून देईल अशी धमकी त्यांनी दिली. पाकिस्तानातले लाखो लोक काश्मिरमधल्या आपल्या भावांना वाचवण्यासाठी भारतात घुसण्याची तयारी करत असल्याचे सांगताना आम्ही त्यांना थांबवलेले असल्याची धक्कादायक माहिती मुशर्रफ यांनी दिली. सीमेवर सुरू असलेल्या गोळीबाराबाबत बोलताना मुशर्रफ म्हणाले की पहिली आगळिक आम्ही काढली असा भारताचा आरोप आहे, तर पहिल्यांदा गोळीबार भारताने केला असा आमचा आरोप आहे. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप सुरूच राहतिल परंतु त्याबाबत काय चर्चा करणार, सत्य काय हे कोण ठरवणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आपल्याला कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नसल्याचे सांगतानाच पाकिस्तान हा आपला देश असून येथे आपले नातेवाईक,मित्र राहतात असे सांगत आपण पाकिस्तान सोडून जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असलेले मुशर्रफ यांच्यावर सध्या देशद्रोहाचा खटला सुरू आहे.