शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी मुशर्रफ फरारी घोषित, दोन पोलीस अधिकाऱ्यांना 17 वर्षांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 9:04 PM

 पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना दहशतवाद विरोधी न्यायालयाने फरार घोषित केले आहे.

इस्लामाबाद, दि. 31 -  पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना दहशतवाद विरोधी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. तसेच, परवेझ मुशर्रफ यांची संपत्ती जप्त करण्याचे  आणि या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.न्यूज डॉट कॉम डॉट पीकेने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने माजी रावळपिंडीचे सीपीओ सौद अझीझ आणि माजी रावळ टाउनचे एस. पी. खुर्रम शहजाद यांना दोषी ठरवत प्रत्येकी 17 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. यावेळी त्यांना न्यायालयातूनच अटक करण्यात आली आहे. बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर सुमारे 10 वर्षांनंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर 2008 साली हा खटला सुरु झाला. तसेच, त्यांच्या हत्येप्रकरणी रफाकत हुसेन, हुसेन गुल, शेर झमान, ऐतियाज शाह, अब्दुल रशिद या पाचजणांना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. याचबरोबर, प्रांतीय तपास संस्थेने केलेल्या फेरतपासाच्या आधारे परवेझ मुशर्रफ यांना 2009 साली आरोपी केले गेले होते.पाकिस्तान पीपल्स पार्टी पक्षाच्या अध्यक्षा आणि दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिलेल्या बेनझीर भुट्टो यांची 27 डिसेंबर 2007 रोजी रावळपिंडीतील लियाकत बाग भागात सभेदरम्यान गोळीबार आणि बॉम्बस्फोटाद्वारे हत्या करण्यात आली होती. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान