शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

6 महिन्यांपासून तरुणाच्या पोटात पडून होता मोबाइल, एक्सरे पाहून डॉक्टरही अवाक...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 11:20 AM

रुग्णाने हा मोबाइल नेमका कसा गिळला, यासंदर्भात अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, पोटात अडकलेला मोबाईल नैसर्गिकरित्या बाहेर येईल, असे त्याला वाटत होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही अन्...

एक व्यक्ती पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे गेली. यानंतर, डॉक्टरांनी तपासणीसाठी तिचा एक्स-रे काढला आणि तो एक्स-रे पाहून स्वतः डॉक्टरच अवाक झाले. कारण रुग्णाच्या पोटात एक मोबाईल फोन असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर, हा मोबाईल फोन एक-दोन नव्हे, तर तब्बल 6 महिन्यांपासून त्या रुग्णाच्या पोटातच पडून असल्याची माहिती समोर आली. (Man swallowed mobile)

'मिरर यूके'ने दिलेल्या वृत्तानुसार, इजिप्तमधील अस्वान युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये 33 वर्षीय व्यक्तीच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी त्याच्या पोटातून एक मोबाईल फोन काढला आहे. हा मोबाईल गेल्या 6 महिन्यांपासून त्याच्या पोटात होता. 

रुग्णाने हा मोबाइल नेमका कसा गिळला, यासंदर्भात अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, पोटात अडकलेला मोबाईल नैसर्गिकरित्या बाहेर येईल, असे त्याला वाटत होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. त्याला खाण्या-पिण्याचाही त्रास होत होता. अखेर, हा मोबाईल जीवघेणा ठरल्याने, त्याला त्वरित शस्त्रक्रिया करावी लागली. 

डॉक्टर्सदेखील अवाक - संबंधित रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यानंतर, डॉक्टरांनी त्याच्या पोटदुखीवर, आतड्यांच्या आणि पेटासंदर्भातील संसर्गाच्या दृष्टीने उपचार करायला सुरुवात केली. मात्र, संबंधित रुग्णाच्या पोटात मोबाईल असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते अवाक झाले. यूएईच्या मीडिया आउटलेट गल्फ टुडेनुसार, अस्वान युनिव्हर्सिटी रुग्णालयाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष मोहम्मद अल-दाहसौरी यांनी म्हटले आहे, की एखाद्या रुग्णाने संपूर्ण मोबाईलच (Nokia 3310) गिळल्याची घटना आपण पहिल्यांदाच पाहिली आहे. 

 

टॅग्स :Mobileमोबाइलhospitalहॉस्पिटल