शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

अजानच्या 5 मिनिटे आधी बंद करावा लागेल लाउडस्पीकर, अन्यथा...; दुर्गापूजा मांडपांना युनूस सरकारचं फरमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 21:54 IST

बांगलादेश सरकारने दुर्गापूजा मंडपांमधील विधी दरम्यान वापरण्यात येणारी वाद्ये आणि लाऊडस्पीकर, अजान आणि नमाज दरम्यान बंद ठेवण्याचे फरमान जारी केले आहे.

बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारानंतर तेथील हिंदूंची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या अंतरीम सरकारला हिंदूंची  सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन केले होते. यातच आता, बांगलादेश सरकारने दुर्गापूजा मंडपांमधील विधी दरम्यान वापरण्यात येणारी वाद्ये आणि लाऊडस्पीकर, अजान आणि नमाज दरम्यान बंद ठेवण्याचे फरमान जारी केले आहे. बांगलादेश सरकारच्या या आदेशाला विरोधही होत आहे.

बांगलादेश ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या गृह विभागाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी, अजान आणि नमाज दरम्यान दुर्गापूजा मंडपांमध्ये वापरलेली जाणारी वाद्ये आणि लाऊडस्पीकर बंद करावीत, असा आदेश मंगळवारी जारी केला आहे. एवढेच नाही, तर अजानच्या पाच मिनिटे आधी म्यूझिक सिस्टिम बंद करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

बांगलादेश पश्चिम बंगालला लागून आहे. यामुळे तेथे राहणाऱ्या हिंदूंची दुर्गा मातेवर अनन्य श्रद्धा आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, यावर्षी बांगलादेशात 32,666 पूजा मंडप उभारण्यात येणार आहेत. यांपैक ढाका दक्षिण शहरात 157 आणि उत्तर सिटी कॉर्पोरेशनमध्ये 88 मंडप असतील. गेल्या वर्षी ही संख्या 33,431 एवढी होती. मात्र यावेळी ही संख्या कमी झाली आहे. ही घट येथील हिंदूंच्या स्थितीमुळे झाली असल्याचे बोलले जात आहे.

बांगलादेश सरकारच्या या फरमानानंतर भारतात विरोध सुरू झाला आहे. कोलकात्यातील इस्कॉनचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ता राधारमण दास यांनी या आदेशाला विरोध केला आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, "बांगलादेशच्या गृहमंत्र्यांचे सल्लागार आदेश देत आहेत की, हिंदूंनी अजानच्या 5 मिनिटे आधी त्यांची पूजा, संगीत आणि कोणतेही विधी थांबवावेत अन्यथा अटकेस सामोरे जावे लागेल. हा नवीन तालिबान बांगलादेश आहे." 

टॅग्स :BangladeshबांगलादेशGovernmentसरकार