शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

खजिन्यासह बुडालेले जहाज सापडले!

By admin | Updated: December 6, 2015 08:15 IST

कार्टाजिना किनाऱ्याजवळ १७०८ मध्ये बुडालेले स्पेनचे जहाज ‘सॅन जोस’चे अवशेष सापडल्याची घोषणा कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष हुआन मॅन्युअल सॅन्टोस यांनी शनिवारी येथे केली.

बोगोटो : कार्टाजिना किनाऱ्याजवळ १७०८ मध्ये बुडालेले स्पेनचे जहाज ‘सॅन जोस’चे अवशेष सापडल्याची घोषणा कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष हुआन मॅन्युअल सॅन्टोस यांनी शनिवारी येथे केली. हे जहाज स्पेनच्या लढाईत इंग्रजांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असलेले राजे फिलीप पंचम यांच्या जहाज ताफ्यातील होते व त्यावर मौल्यवान रत्ने, सोन्याचांदीची नाणी आणि आभूषणांचा खजिना लादलेला होता, अशी दंतकथा या जहाजाबाबत आहे. त्यामुळे या जहाजाबाबत अनेक वर्षांपासून कुतूहलमिश्रित उत्सुकता आहे.या जहाजाचे अवशेष सापडल्याची माहिती राष्ट्राध्यक्षांनी टष्ट्वीट करून दिली. या शोधाबाबतची अधिक माहिती नंतर पत्रकार परिषदेत देण्यात येणार आहे. यापूर्वी सी सर्च अर्माडा (एसएसए) या अमेरिकन कंपनीने १९८१ मध्ये सॅन जोस जहाज बुडालेले ठिकाण आपण शोधले असल्याची घोषणा केली होती. तेव्हा कोलंबिया सरकार एसएसएसोबत काम करत होते. मात्र, नंतर कोलंबिया सरकारने शोधादरम्यान मिळालेल्या खजिन्यावर केवळ कोलंबियाचाचअधिकार असेल, असे म्हटल्यामुळे कंपनी व सरकारमध्ये वाद निर्माण होऊन प्रकरण न्यायालयात गेले होते. पुढे २०११ मध्ये अमेरिकी सरकारने कोलंबिया सरकारचा दावा मान्य केला होता. त्यानंतर कोलंबिया सरकारने हा खजिना मिळविण्यासाठी पुन्हा शोधमोहीम सुरू केली होती. ब्रिटिश फौजांशी युद्ध सुरू झाल्यानंतर स्पेनच्या राजाने आपला खजिना जहाजाद्वारे सुरक्षित ठिकाणी रवाना केला होता. मात्र, इंग्लिश कमांडर चार्ल्स वेगर यांनी हे जहाज शोधून काढले. या जहाजासाठी झालेल्या लढाईदरम्यान जहाजाचा स्फोट झाला व ते समुद्रात बुडाले. स्फोटामुळे जहाजातील सर्व कर्मचारी मारले गेले होते. या जहाजावर ४ ते १६ अब्ज डॉलर मूल्याचा खजिना असल्याची चर्चा आहे. (वृत्तसंस्था)