शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

आदर्श लोकशाही मानल्या गेलेल्या अमेरिकेत गोळीबार हे दुर्दैव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 5:03 AM

राज्यपाल : आणीबाणीनंतर भारतात पंतप्रधानांना खुर्ची सोडावी लागली असल्याची आठवण

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राजकारणात खुर्ची इतकी महत्त्वाची असते की त्या खुर्चीवरून जगभरात आदर्श मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या संसदेत गोळीबार झाला हे दुर्दैव आहे. मात्र भारतात जेव्हा आणीबाणी लागू केली होती, तेव्हा त्या विरोधात जनतेने आंदोलन केल्यामुळे आपल्या पंतप्रधानांना खुर्ची सोडावी लागली होती. इतका आदर्श विचार, आदर्श चिंतन भारतातच दिसते, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी केले.

ठाण्यात आयोजित ३५ व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते सरस्वती क्रीडा संकुलाच्या सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष संजय केळकर तसेच आमदार निरंजन डावखरे व्यासपीठावर उपस्थित होते. केळकर यांनी या वेळी राज्यपालांचे स्वागत केले. उद्घाटनाच्या सुरुवातीला कोश्यारी यांनी उपस्थितांशी “मला खोकला होतोय, इतकी मराठी मी शिकलोय,” असा मराठीत संवाद साधत आपल्या मिश्कील स्वभावाची चुणूक दाखवली.‘सोने की चिडीया’ म्हटला जाणारा भारत समृद्ध देश होता. परकीय आक्रमणानंतरही देशाची वाटचाल सुरूच राहिली. त्यानंतरही महापुरुषांच्या बलिदान आणि दूरदृष्टीने भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले. याच भारताने जगाला ‘विश्वबंधुत्व’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश दिला. आपल्या देशाला संत, थोर महापुरुष व व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. त्याच विचारांवर देश चाललाय हे आपले वैशिष्ट्य आहे. आपला इतिहास हेच देशाचे प्रजातंत्र आहे. अनेक आक्रमणांनंतरही आपला देश जिवंतच नाही, तर समृद्ध आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितले आहे. ही कोणत्या पक्षाची विचारधारा नाही, तर ती देशाची, जगाची आवश्यकता आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जगभरातील १८० देश एकत्र येतात ही बाब अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे, असे म्हणत कोश्यारी यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळली.

पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताचा संदेश दिला आहे. पण हे तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रत्येक जण आत्मनिर्भर बनू. चिनी वस्तू, उत्पादन विकणे बंद करणे हे फक्त भारतच करू शकतो, इतकी हिंमत दुसऱ्या कोणत्या देशात नाही, असेही कोश्यारी म्हणाले. पूर्वी धान्याची आपल्या देशात आयात व्हायची. आता मात्र धान्य गोदामांमध्ये सडतेय, इतका देश सुजलाम् सुफलाम् आहे. देशाला समृद्ध बनवणे हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ नाही, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUS Riotsअमेरिका-हिंसाचार