मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:23 IST2025-06-20T17:22:47+5:302025-06-20T17:23:29+5:30

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन म्हणाले, "बुशहरमध्ये रशियाचे 600 कर्मचारी कार्यरत...

Israel iran war Big news Iran nuclear power project is safe Israel gave a big promise Russia claims | मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा

मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा


इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायली हल्ल्यांनंतर आता इराणनेही जबरदस्त पलटवार करायला सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे, आज इराणने इस्रायलवर क्लस्टर बॉम्बने हल्ला केला आणि अनेक ठिकाणांना निशाणा बनवले.

बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पातील परिस्थिती सामान्य -
दरम्यान, रशियाचे अणुऊर्जा प्रमुख अॅलेक्सी लिखाचेव्ह यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, "इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पातील परिस्थिती सामान्य असून नियंत्रणात आहे. येथे शेकडो रशियन तज्ज्ञ काम करत आहेत." इस्रायली सैन्याने गुरुवारी एक निवेदन जारी करत आपण बुशेहर प्रकल्पावर मोठा हल्ला केल्याचे म्हटले होते. मात्र नंतर, आपल्याकडून चुकीची माहिती दिली गेली असल्याचेही इस्रायलने म्हटले होते.

...तर चेरनोबिलसारखी परिस्थिती निर्माण होईल -
राज्य अणुऊर्जा महामंडळ रोसाटॉमचे प्रमुख लिखाचेव्ह म्हणाले, "जर इस्रायलने इराणमधील अणुउर्जा प्रकल्पांवर हल्ला केला, तर चेरनोबिलसारखी अणू परिस्थिती निर्माण होईल." तसेच, शुक्रवारी बुशेहरमधील परिस्थितीसंदर्भात विचारले असता, आतापर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे लिखाचेव्ह यांनी म्हटले आहे.

इस्रायलनं शब्द दिलाय - 
दुसरीकडे, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन म्हणाले, "बुशहरमध्ये रशियाचे 600 कर्मचारी कार्यरत आहेत. यांपैकी २५० कायमस्वरूपी कर्मचारी तर इतर तात्पुरत्या नियुक्तीवरील कर्मचारी आहेत. इस्रायलने या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा शब्द दिला आहे." दरम्यान, काही लोकांना तेथून बाहेर काढले आहे. मात्र, काही मुख्य कर्मचारी अजूनही तेथे आहेत, असे लिखाचेव यांनी म्हटले आहे. 


 

Web Title: Israel iran war Big news Iran nuclear power project is safe Israel gave a big promise Russia claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.