शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेवर आखाती देश प्रचंड नाराज! इराणवर हल्ले करण्यापूर्वी विश्वासात घेतले नाही, वाऱ्यावर सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 04:32 IST

Iran US Israel War News इराण-इस्रायल युद्धाचा भडका! अमेरिकेच्या भूमिकेमुळे आखाती मित्रराष्ट्र नाराज. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शरण येण्याचा इशारा, तर लेबनॉनमध्ये इस्रायलची भीषण बॉम्बफेक. पाहा सविस्तर अपडेट्स.

मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली असून, अमेरिकेच्या युद्धनीतीमुळे आता तिचे स्वतःचे आखाती मित्रराष्ट्र नाराज झाले आहेत. इराणवर हल्ले करण्यापूर्वी अमेरिकेने विश्वासात घेतले नाही आणि प्रतिहल्ल्यावेळी वाऱ्यावर सोडले, असा गंभीर आरोप या देशांनी केला आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला "बिनशर्त शरण या, अन्यथा युद्धाला सामोरे जा" असा स्पष्ट इशारा दिला आहे.

मित्रराष्ट्रांचा संताप आणि तक्रारी:पर्शियाच्या आखातातील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांनी ट्रम्प प्रशासनावर अनेक गंभीर आक्षेप घेतले आहेत. इस्रायलसोबत मिळून केलेल्या हल्ल्याची पूर्वसूचना मित्रराष्ट्रांना देण्यात आली नव्हती. अमेरिकन सैन्य केवळ स्वतःच्या आणि इस्रायलच्या सैनिकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत असून आम्हाला असुरक्षित सोडले आहे, असा आरोप एका अधिकाऱ्याने केला. इराणची क्षेपणास्त्रे रोखणाऱ्या 'इंटरसेप्टर्स'चा साठा वेगाने संपत असल्याने या देशांसमोर सुरक्षेचे मोठे संकट उभे राहिले आहे.

लेबनॉनमध्ये रक्ताचा सडाइस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील स्रिफा, सिदोन आणि मजदल सेलम यांसारख्या शहरांवर तुफान बॉम्बफेक केली आहे. सिदोनमधील हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू झाला असून, या आठवड्यात मृतांची संख्या १२३ वर पोहोचली आहे. हिजबुल्लाने आता इस्रायली नागरिकांना सीमावर्ती भाग रिकामी करण्याचा इशारा दिला असून मोठ्या भूदलाच्या कारवाईची शक्यता वाढली आहे.

इराणचे 'ड्रोन वाहक' जहाज पेटवलेअमेरिकेने इराणच्या ‘आयआरआयएस शाहिद बाघेरी’ या अद्ययावत ड्रोन वाहक जहाजावर हल्ला करून त्याला आग लावली आहे. हे जहाज इंधन न भरता २२ हजार नॉटिकल मैल प्रवास करण्यास सक्षम होते. तसेच, इराणमधील केरमानशाह जवळील अनेक क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

दोन जपानी नागरिक ताब्यातइराणमध्ये तणाव वाढत असतानाच एनएचके (NHK) या वृत्तसंस्थेचे तेहरान ब्युरो प्रमुख शिनोसुके कावाशिमा यांच्यासह दोन जपानी नागरिकांना इराणने ताब्यात घेतले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gulf nations furious with US; distrust after Iran strikes.

Web Summary : Gulf allies are angered by America's Iran strategy, feeling abandoned after attacks and not consulted beforehand. Israel strikes Lebanon; Iran's drone carrier destroyed. Two Japanese citizens detained amidst rising tensions.
टॅग्स :IranइराणWarयुद्धAmericaअमेरिका