इराण हादरले! अयातुल्ला खामेनींच्या निवासस्थानावर २५० मुजाहिदीनांचा भीषण हल्ला; सत्तापालटाचा प्रयत्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:59 IST2026-02-25T13:59:30+5:302026-02-25T13:59:54+5:30

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 'बेत-ए रहबरी'वर २५० सशस्त्र मुजाहिदीनांनी भीषण हल्ला केल्याचा दावा 'पीपुल्स मुजाहिद्दीन' या संघटनेने केला आहे.

Iran shaken! 250 Mujahideen attack on Ayatollah Khamenei's residence; coup attempt? | इराण हादरले! अयातुल्ला खामेनींच्या निवासस्थानावर २५० मुजाहिदीनांचा भीषण हल्ला; सत्तापालटाचा प्रयत्न?

इराण हादरले! अयातुल्ला खामेनींच्या निवासस्थानावर २५० मुजाहिदीनांचा भीषण हल्ला; सत्तापालटाचा प्रयत्न?

मध्य पूर्व आशियातील अत्यंत शक्तिशाली देश असलेल्या इराणमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 'बेत-ए रहबरी'वर २५० सशस्त्र मुजाहिदीनांनी भीषण हल्ला केल्याचा दावा 'पीपुल्स मुजाहिद्दीन' या संघटनेने केला आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या घरावर झालेला हा अशा प्रकारचा पहिलाच सुनियोजित हल्ला असल्याचे बोलले जात आहे.

नेमके काय घडले तेहरानमध्ये?

बीबीसी फारसीने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी मध्य तेहरानमध्ये असलेल्या खामेनींच्या कार्यालयावर आणि घराच्या दिशेने २५० मुजाहिदीन आधुनिक शस्त्रास्त्रांसह चालून गेले. या सशस्त्र संघर्षात अनेक इराणचे सैनिक ठार झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. मात्र, इराणची अधिकृत वृत्तसंस्था 'मेहर न्यूज'ने केवळ ४ जणांना अटक केल्याचे सांगत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यादरम्यान अनेक मुजाहिदीन मारले गेल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खामेनी बंकरमध्ये; मुलाच्या खांद्यावर जबाबदारी

देशात वाढता तणाव पाहता अयातुल्ला अली खामेनी यांनी आपले निवासस्थान सोडून एका सुरक्षित अंडरग्राउंड बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. सध्या त्यांच्या कार्यालयाची आणि घराची सर्व जबाबदारी त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी सांभाळत आहे. इराण संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे सदस्य अहमद बख्शायेश अर्देस्तानी यांनी या हल्ल्याबाबत मौन बाळगले असले तरी, देशाला कमकुवत दाखवण्यासाठी असे प्रयत्न होऊ शकतात, असे सूचक विधान केले आहे.

कोण आहे ही 'MEK' संघटना?

'पीपुल्स मुजाहिद्दीन' किंवा 'एमईके' ही संघटना १९६५ मध्ये शाह पहेलवी यांच्या राजवटीविरुद्ध लढण्यासाठी स्थापन झाली होती. १९७९ च्या क्रांतीत या संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली, पण नंतर खामेनींशी मतभेद झाल्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. ही संघटना इराणला एक 'धर्मनिरपेक्ष राष्ट्र' बनवू इच्छिते. विशेष म्हणजे, २००२ मध्ये इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची गुप्त माहिती याच संघटनेने जगासमोर आणली होती.

हल्ल्याचे महत्त्व काय?

इराणमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विरोधकांचा आवाज दाबला गेला आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च नेत्याच्या घरावर थेट हल्ला होणे, हे इराणमधील अंतर्गत असंतोष उफाळून आल्याचे लक्षण मानले जात आहे. या हल्ल्यामुळे इराणमधील इस्लामिक राजवटीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title : ईरान में खलबली: खामenei के निवास पर हमला; तख्तापलट की कोशिश?

Web Summary : ईरान के सर्वोच्च नेता खामenei के निवास पर 250 सशस्त्र मुजाहिदीनों ने हमला किया, जिससे शासन की सुरक्षा पर सवाल उठे। MEK ने बढ़ती आंतरिक असहमति और खामenei के बंकर में स्थानांतरण के बीच जिम्मेदारी का दावा किया।

Web Title : Iran Rocked: Attack on Khamenei's Residence; Coup Attempt?

Web Summary : Iran's Supreme Leader Khamenei's residence was reportedly attacked by 250 armed Mujahedeen, raising questions about the regime's security. MEK claims responsibility amid rising internal dissent and Khamenei's relocation to a bunker.