शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी इराणवर होऊ शकतो हल्ला; अमेरिकेचा लष्करी हल्ल्याचा 'प्लॅन' समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 08:55 IST

नेते टार्गेटवर, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना योजना सांगितली  

तेल अवीव/तेहरान/वॉशिंग्टन - अमेरिका पहिल्यांदाच इराणविरुद्ध हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वापर करू शकते. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (सीईएनटीसीओएम)च्या कमांडरने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणविरुद्ध संभाव्य हल्ला करण्याच्या पर्यायांची माहिती दिली आहे. 

ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी व्हाइट हाऊसच्या सिच्युएशन रूममध्ये ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत हे पर्याय सादर केले. यामध्ये असे सांगण्यात आले की, ट्रम्प यांनी पुन्हा हल्ला करण्याचा निर्णय घेतला, तर एक ‘लहान पण खूप शक्तिशाली हल्ला’ केला जाऊ शकतो. वृत्तानुसार, या हल्ल्यात इराणची उर्वरित लष्करी ताकद, त्याचे नेते आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाऊ शकते. अमेरिकेने इराणवर आतापर्यंत केलेल्या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतरही त्या देशाने कडवी झुंज देण्याची तयारी सुरू केली आहे. 

दोन हजार मैल लक्ष्यसंरक्षण मंत्रालय काही नवीन आणि प्रगत शस्त्रे वापरण्याचाही विचार करत आहे. यामध्ये ‘डार्क ईगल’ नावाच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राचाही समावेश आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे २ हजार मैल दूरपर्यंत लक्ष्य साधू शकते आणि इराणच्या उर्वरित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र लाँचरना लक्ष्य करू शकते. याव्यतिरिक्त, बी-१बी लांसर बॉम्बर विमानांची संख्याही या भागात वाढविण्यात येत आहे. ही विमाने मोठ्या प्रमाणात शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत आणि हायपरसोनिक शस्त्रेदेखील वाहून नेऊ शकतात.

मोठे अपडेट्स…ट्रम्पची धमकी : ट्रम्प यांनी एका समाज माध्यमावर आपला फोटो शेअर करत म्हटले, वादळ पुढे सरकत आहे. याला कोणीही थांबवू शकणार नाही.इराणचे प्रत्युत्तर : सर्वोच्च नेते मुजतबा खामेनेई म्हणाले, आम्ही हल्लेखोरांना समुद्रात बुडवून टाकू. पर्शियन गल्फमध्ये त्यांच्यासाठी कोणतीही जागा नाही.तेलाची किंमत वाढली : गुरुवारी कच्च्या तेलाची किंमत वेगाने वाढून प्रति बॅरल सुमारे १२६ डॉलरच्या पुढे गेली. गेल्या ४ वर्षांतील ही सर्वाधिक वाढ होती.  मुजतबांच्या आरोग्यावर चर्चा: मुजतबा खामेनेई यांच्या आरोग्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. ते अद्याप कधीही सार्वजनिकरीत्या दिसले नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : US considers hypersonic missile strike on Iran: Military plan revealed.

Web Summary : US contemplates using hypersonic missiles against Iran, targeting military assets and infrastructure. The 'Dark Eagle' missile, with a 2,000-mile range, could strike ballistic missile launchers. B-1B bombers are being deployed, escalating tensions and raising oil prices.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराण