खाडी देशांमधील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. इराणने कुवेतच्या नागरी पायाभूत सुविधांवर भीषण हल्ले केले आहेत. कुवेतच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणने रविवारी सायंकाळच्या सुमारास एका पॉवर स्टेशनला लक्ष्य केले. या दुर्दैवी हल्ल्यात तिथे कार्यरत असलेल्या एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. प्रकल्पातील एका इमारतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कुवेत सरकारने हा हल्ला म्हणजे इराणची आक्रमकता असल्याचे म्हणत, तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू -कुवेतच्या वीज, पाणी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रवक्त्या इंजिनिअर फातिमा अब्बास जोहर हयात यांनी एका निवेदनाद्वारे या हल्ल्याची पुष्टी केली. "कुवेतविरुद्ध सुरू असलेल्या इराणी आक्रमणांतर्गत, एका वीज आणि जलशुद्धीकरण प्रकल्पातील सर्व्हिस बिल्डिंगवर हल्ला करण्यात आला. यात एका निष्पाप भारतीय कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे," असे त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यामुळे प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम झाला आहे.
कुवेतवर ३०० हून अधिक बॅलेस्टिक मिसाईल्स आणि ६०० हून अधिक ड्रोन्सने हल्ला -अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका कुवेतलाही सहन करावा लागत आहे. कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत कुवेतवर एकूण ३०७ बॅलेस्टिक मिसाईल्स, २ क्रूझ मिसाईल्स आणि ६१६ ड्रोन्स डागण्यात आले आहेत. इराणने पश्चिम आशियातील अमेरिकन तळ आणि महत्त्वाच्या सरकारी यंत्रणांना लक्ष्य करण्याचे धोरण अवलंबले आहे.
संरक्षण दलाची कारवाई -कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल सौद अल-अतवान यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कुवेतने १४ बॅलेस्टिक मिसाईल्स आणि १२ शत्रू ड्रोन्स नष्ट केले आहेत. मात्र, यातील काही मिसाईल्सनी कुवेती सशस्त्र दलाच्या तळांना लक्ष्य केले. यात १० कर्मचारी जखमी झाले असून तळाचे मोठे नुकसान झाले आहे.
Web Summary : Iran attacked Kuwait, targeting power and water infrastructure. An Indian worker died in the missile strike. Kuwait faces over 300 ballistic missiles and 600 drones. Kuwait's defense forces intercepted some missiles, but suffered casualties and damage.
Web Summary : ईरान ने कुवैत पर हमला किया, बिजली और पानी के बुनियादी ढांचे को निशाना बनाया। मिसाइल हमले में एक भारतीय कर्मचारी की मौत हो गई। कुवैत पर 300 से अधिक बैलिस्टिक मिसाइलें दागी गईं। कुवैत के सुरक्षा बलों ने कुछ मिसाइलों को रोका, लेकिन नुकसान हुआ।