इराणच्या एका जबरदस्त हल्ल्यानं अमेरिकेला अब्जावधीचं नुकसान; US चीनच्या जाळ्यातही अडकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:23 IST2026-03-07T16:23:18+5:302026-03-07T16:23:41+5:30
हे रडार अत्यंत आधुनिक आणि प्रगत होते. त्यासाठी लाखो डॉलर्सही खर्च झाले होते. परंतु अमेरिकेसाठी आणखी मोठी समस्या म्हणजे त्यांना पुन्हा रडार उभारण्यासाठी चीनकडे पहावे लागेल.

इराणच्या एका जबरदस्त हल्ल्यानं अमेरिकेला अब्जावधीचं नुकसान; US चीनच्या जाळ्यातही अडकणार
वॉशिंग्टन - अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर इराणनेही जोरदार पलटवार करत अमेरिकन सैन्य तळांना आणि इतर साहित्यांना टार्गेट केले. इराणने केलेल्या हल्ल्यात कतार आणि बहरीनमधील कोट्यवधी डॉलर्सच्या अमेरिकन रडार सिस्टीम नष्ट केल्या आहेत. इराणने त्यांच्या शाहेद ड्रोनचा वापर करून कतारमधील जगातील सर्वात मोठी रडार सिस्टीम नष्ट केली, ज्याची किंमत सुमारे १.१ अब्ज डॉलर होती. अमेरिका अरब देशांवर इराणी हल्ले रोखण्यासाठी या रडारचा वापर करत होती. ज्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे होते.
इराणने केवळ २० हजार डॉलर किंमतीच्या शाहेद कामिकेज ड्रोनने कतारमधील अल उदेद हवाई तळावर AN/FPS-132 ब्लॉक 5 अपग्रेडेड अर्ली वॉर्निंग रडार (UEWR) वर हल्ला केला. इराणने त्यांच्या प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हे रडार नष्ट केले. शस्त्र काहीही असो क्षेपणास्त्र असो किंवा ड्रोन, दोन अमेरिकन रडार नष्ट झाल्याची पुष्टी रिपोर्टमधून झाली आहे.
चीनच्या जाळ्यात अमेरिका अडकली
हे रडार अत्यंत आधुनिक आणि प्रगत होते. त्यासाठी लाखो डॉलर्सही खर्च झाले होते. परंतु अमेरिकेसाठी आणखी मोठी समस्या म्हणजे त्यांना पुन्हा रडार उभारण्यासाठी चीनकडे पहावे लागेल. कतारमधील AN/FPS-132 आणि बहरीनमधील AN/TPS-59 या दोन प्रगत रडारना मोठे नुकसान झाले आहे. आता या दोन्ही रडारची दुरुस्ती करण्यासाठी लागणारा कच्चा माल चीनमधून यावा लागेल. रडारशिवाय अमेरिकेच्या हवाई संरक्षण प्रणाली मोठ्या प्रमाणात निरुपयोगी ठरतील. AN/FPS-132 रडार अमेरिकन कंपनी रेथिऑनने बनवला आहे आणि त्याची किंमत १.१अब्ज डॉलर आहे. आता या रडारची पुनर्निर्मिती करण्यासाठी पाच ते आठ वर्षे लागतील. लॉकहीड मार्टिनला AN/TPS-59 रडार तयार करण्यासाठी किमान दोन वर्षे आणि अंदाजे ५० मिलियन डॉलरहून जास्त खर्च येईल. त्याशिवाय दोन्ही रडारना ७७.३ किलोग्रॅम गॅलियमची आवश्यकता असते आणि हे गॅलियम चीनकडून आणावे लागेल.
चीन कच्चा माल पुरवेल का?
रडारसाठी लागणाऱ्या साहित्यात हे एक असं मटेरियल आहे, ज्यासाठी चीन जागतिक पुरवठ्याच्या ९८ टक्के वाटा उचलतो. याव्यतिरिक्त ३०,६१० किलोग्रॅम तांब्याची आवश्यकता असेल, ही एक वस्तू आहे जी तंत्रज्ञान क्षेत्रातून वाढत्या मागणीला तोंड देत आहे. चीन आणि अमेरिकेतील सध्याचे संबंध लपले नाहीत आणि म्हणूनच चीन नवीन रडारसाठी कच्चा माल अमेरिकेला लवकर पुरवेल का हा एक प्रमुख प्रश्न आहे.