शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 17:08 IST

नसराल्लाह याच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा आता कोणावरही विश्वास राहिलेला नाही.

इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसराल्लाह याचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष आता पेटला आहे. यातच इस्रायलच्या या कारवाईमुळे इराणचा तीळपापड झाला असून, गेल्या चार दिवसांपूर्वी इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रांसह जोरदार हल्ला चढवला. आता इस्रायलने इराणला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. 

दरम्यान, इस्रायल नसराल्लाहच्या लपण्याच्या ठिकाणी पोहोचला कसा? असा प्रश्न इराण पडला. त्यानंतर इराणचा संशय बळावला तेव्हा हे प्रकरण मोसादच्या एजंटांपर्यंत पोहोचले. हिजबुल्लाहमध्ये मोसादचे अनेक एजंट असल्याची माहिती इराणला मिळाली. तसेच, इराणमध्येही अनेक वरिष्ठ सरकारी पदांवर मोसादचे एजंट तैनात असल्याचे तपासात समोर आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण इराणमध्ये भीतीचे वातावरण आहे. नसराल्लाह याच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा आता कोणावरही विश्वास राहिलेला नाही.

इराणकडून तपास सुरू इराणने आता इस्रायली एजंटची चौकशी सुरू केली आहे. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, रिव्होल्युशनरी गार्डपासून वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी केली जात आहे. परदेशात जाणारे अधिकारी आणि ज्यांचे कुटुंबीय परदेशात राहतात त्यांची प्रथम तपासणी केली जात आहे.

इराणचा कोणावर आहे संशय?रिव्होल्युशनरी गार्डचे काही अधिकारी लेबनॉनला जात असल्याबद्दल इराणला संशय आहे. यातील एका अधिकाऱ्याने नसराल्लाहचा ठावठिकाणा विचारला होता. इराणने या अधिकाऱ्यासह अन्य काही संशयितांना अटक केली आहे. मात्र, त्याचे संपूर्ण कुटुंब इराणमधून पळून जाण्यात यशस्वी झाले.

इराण आणि हिजबुल्लाह यांच्यात अविश्वास निर्माण अन्य एका इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, नसराल्लाह याच्या हत्येनंतर इराण आणि हिजबुल्लाह यांच्यात अविश्वास निर्माण झाला आहे. दुसरीकडे, इराणच्या सत्ता स्थापनेच्या जवळच्या सूत्राने माहिती दिली आहे की, सर्वोच्च नेते आता कोणावरही विश्वास ठेवत नाहीत.

'या' दोन हत्यांनी इराणला बसला धक्का या वर्षी जुलैमध्ये हिजबुल्लाहचा कमांडर फुआद शुकर लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये एका गुप्त ठिकाणी लपून बसला होता. पण अचूक गुप्तचरांच्या आधारे इस्रायलने त्याला हवाई हल्ल्यात ठार केले. त्याच्या हत्येनंतर काही तासांनी इराणची राजधानी तेहरानमध्ये हमास प्रमुख इस्माईल हानियाची हत्या करण्यात आली. या दोन हत्येनंतर मोसादचे एजंट आतमध्ये घुसल्याचे हिजबुल्लाह आणि इराणला समजले. त्यामुळे मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीय