दुबई विमानतळावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला! ४ कर्मचारी जखमी; प्रवाशांमध्ये घबराट, एअरपोर्ट रिकामे करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 04:29 IST2026-03-01T04:27:31+5:302026-03-01T04:29:01+5:30
Iran attack on Dubai DXB Airport : इराण-इस्रायल युद्धाचा भडका आता दुबईपर्यंत पोहोचला आहे. इराणने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्र डागले असून ४ कर्मचारी जखमी झाले आहेत.

दुबई विमानतळावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला! ४ कर्मचारी जखमी; प्रवाशांमध्ये घबराट, एअरपोर्ट रिकामे करण्याचे आदेश
पश्चिम आशियातील युद्ध आता अधिकच भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील जगातील सर्वात व्यस्त असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य करत क्षेपणास्त्र डागले आहे. या हल्ल्यात विमानतळाच्या एका भागाचे नुकसान झाले असून ४ कर्मचारी जखमी झाले आहेत.
दुबई मीडिया ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, इराणने या भागात असलेल्या अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यासाठी क्षेपणास्त्रे डागली होती, ज्यापैकी एक दुबई विमानतळाच्या 'कॉनकोर्स' परिसरात पडले. दुबई एअरपोर्ट्सने 'X' (ट्विटर) वर पोस्ट करून या घटनेची पुष्टी केली आहे. या घटनेत चार कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्रवाशांना हलवले
विमानतळावर आधीच 'इमर्जन्सी प्लॅन' लागू करण्यात आला होता, त्यामुळे अनेक टर्मिनल्स रिकामे करून घेण्यात आले होते. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सध्या आपत्कालीन पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहेत.
उड्डाणे ठप्प
या हल्ल्यानंतर दुबई विमानतळावरील सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. हजारो भारतीय प्रवासी आणि सोनल चौहान, पी.व्ही. सिंधू सारख्या सेलिब्रिटी आधीच येथे अडकल्या असताना या हल्ल्याने भीती वाढवली आहे.
Iranian drone strike hits Dubai International Airport pic.twitter.com/LNemL1V4rU
— Video_F (@Video_Forensics) February 28, 2026