शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिस मसुद्यावर भारताचा आक्षेप

By admin | Updated: December 10, 2015 23:22 IST

ग्लोबल वॉर्मिंग आटोक्यात ठेवण्यासाठी करावयाच्या अंतिम करारावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी देशांनी करावयाचे स्वेच्छा संकल्प, तसेच इतर अनेक बाबी संभाव्य अंतिम मसुद्यामध्ये समाविष्ट

पॅरिस : ग्लोबल वॉर्मिंग आटोक्यात ठेवण्यासाठी करावयाच्या अंतिम करारावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी देशांनी करावयाचे स्वेच्छा संकल्प, तसेच इतर अनेक बाबी संभाव्य अंतिम मसुद्यामध्ये समाविष्ट न केल्याबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. या मसुद्याबाबत भारत सहमत नसल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पर्यावरण परिषदेच्या चर्चेदरम्यान जावडेकर यांनी भारताचे आक्षेप नोंदवले. शुक्रवारी परिषदेचा अंतिम दिवस असून परिषदेत करावयाच्या करारावर अद्याप सहमती झालेली नाही. पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सियसने कमी करण्यासाठी विकसित देशांनी आपल्या कार्बन उत्सर्जनामध्ये अधिक कपात करण्याची गरज असून विकसनशील देशांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्येही वाढ केली पाहिजे. प्रदूषणाची पातळी औद्योगिकरणापूर्वीची असली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. जावडेकर म्हणाले की, राष्ट्रीय निर्धारित योगदान ही संकल्पना अभूतपूर्व असून त्यामुळे 186 देशांचा सहभाग निश्चित झाला असला तरी या संकल्पनेचा उल्लेखच संभाव्य मसुद्यामध्ये नाही. पॅरिस परिषदेतील मंत्रीस्तरीय बैठकीनंतर तयार झालेला पहिला मसुदा जारी करण्यात आला असून भारताने यावर आक्षेप घेतला आहे. आर्थिक मुद्यांचा उल्लेख करून जावडेकर म्हणाले की, विकसित देशांनी याही बाबतीत निराशा केली. आपली जबाबदारी ते विकसनशील देशांवर ढकलत आहेत. विकसित देश आर्थिक मदतीत वाढ तर करीत नाहीत, पण याबाबतची त्यांची दिशाही निश्चित नाही. पर्यावरण रक्षणाचे लक्ष्य व तत्त्वांमधील भेद यांना सारखेच महत्त्व असून एकाशिवाय दुसरा व्यर्थ आहे, पण विकसित देश हे विचारात घ्यायला तयार नाहीत.२००९ मध्ये झालेल्या परिषदेत पृथ्वीचे तापमान २ अंशांनी कमी करण्याची चर्चा झाली. बेटे व कमी विकसित देश यांचे मत आहे की, हे निर्धारण किमान १.५ अंश तरी असावे. विकसित देशांनी यात पुढाकार घेतला नाही तर हे लक्ष्य गाठणे शक्य होणार नाही, असे मत भारतातील पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. (वृत्तसंस्था)