शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या दणक्याने पाकिस्तान बिथरला

By admin | Updated: June 11, 2015 23:55 IST

म्यानमारच्या हद्दीत घुसून भारताने १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर, दहशतवाद्यांना खुलेआम आश्रय देणाऱ्या पाकच्या छातीत धडकी भरली

इस्लामाबाद : म्यानमारच्या हद्दीत घुसून भारताने १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर, दहशतवाद्यांना खुलेआम आश्रय देणाऱ्या पाकच्या छातीत धडकी भरली असून, पाक बिथरला आहे. पाक म्हणजे म्यानमार नव्हे, पाककडे अण्वस्त्रे आहेत हे विसरू नका, असा इशारा पाक भारताला देत आहे. म्यानमारच्या भूमीचा आश्रय घेऊन भारतात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. आॅपरेशन फत्ते नावाने केलेल्या या कारवाईत भारताने फक्त ४५ मिनिटांत १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या कारवाईनंतर भारतातील राजकीय पातळीवर या कारवाईची प्रशंसा होत असून, हा पाकलाही इशारा असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पाकिस्तान बिथरला असून, पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली व लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी भारताला लगेचच प्रतिइशारा दिला आहे. पाकिस्तान म्हणजे म्यानमार नव्हे, सीमेपलीकडून आलेल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. पाकविरोधात कोणाचे मनसुबे असतील तर ते उधळून लावू असा इशारा या पाकिस्तानी नेत्यांनी दिला आहे. अशी वक्तव्ये करून या पाक नेत्यांनी भारतातील दहशतवादी कारवायात पाकिस्तानचा हात असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे. (वृत्तसंस्था)