वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:41 IST2025-11-19T12:40:54+5:302025-11-19T12:41:50+5:30
ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये एका भारतीय महिलेचा कार अपघातात मृत्यू झाला. ३३ वर्षीय महिला ८ महिन्यांची गर्भवती होती.

वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये एका भारतीय महिलेचा कार अपघातातमृत्यू झाला. ३३ वर्षीय महिला ८ महिन्यांची गर्भवती होती आणि काही दिवसांतच तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समनविता धारेश्वर तिचा पती आणि ३ वर्षाच्या मुलासह चालत जात असताना हा अपघात झाला. एका वेगाने येणाऱ्या BMW ने महिलेला जोरदार धडक दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता समनविता आणि तिचं कुटुंब हॉर्न्सबी येथील जॉर्ज सेंटजवळ फूटपाथ ओलांडत होते. किआ कार्निव्हल कारने त्यांना रस्ता दिला आणि आपला वेग कमी केला, परंतु एका वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यूने मागून या कारला जोरदार धडक दिली, यामुळे पार्कच्या प्रवेशद्वारावरून जाणाऱ्या समनविताला धडक बसली.
या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिचा जीव वाचला नाही. बीएमडब्ल्यू कार १९ वर्षीय आरोन पापाझोग्लू चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. कारच्या चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. समनविताच्या लिंक्डइन अकाउंटनुसार, ती एक क्वालिफाइड आयटी सिस्टम्स एनालिस्ट होती आणि एल्स्को युनिफॉर्म्ससाठी टेस्ट एनालिस्ट म्हणून काम करत होती.
अपघातानंतर बीएमडब्ल्यू ड्रायव्हरला अटक करण्यात आली. आरोपीला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं, जिथे खटल्याच्या गांभीर्यामुळे त्याला जामीन नाकारण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गेल्या आठवड्यात ही धक्कादायक घटना घडली. समनविताच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.