शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

'प्रवास टाळा...', बांगलादेशातील दंगे थांबेनात; भारतीयांसाठी ॲडवायजरी जारी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 14:26 IST

बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाला विरोध होत आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी १८ जुलै रोजी देशव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाला विरोध सुरू आहे. यामुळे अजुनही दंगे सुरू आहेत, सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. हिंसाचारामुळे शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावास सतर्क झाला आहे. दूतावासाने बांगलादेशमध्ये उपस्थित असलेल्या भारतीयांसाठी एक सूचना जारी केली आहे.

आपल्या ॲडव्हायझरीमध्ये भारतीय दूतावासाने भारतीय समुदायाच्या लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगितले आहे. बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता तेथे राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोणताही प्रवास टाळावा, असे सल्लागारात म्हटले आहे. भारतीय दूतावास आपल्या नागरिकांना २४ तास सेवा देण्यासाठी तत्पर आहे. दूतावासाने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत.

Chandipura Virus : भीतीदायक! गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रकोप; १५ जणांचा मृत्यू, आढळले २७ रुग्ण

१९७१ च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी बांगलादेशातील सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण संपुष्टात आणण्याची मागणी होत आहे. मात्र, पंतप्रधान शेख हसीना यांनी आरक्षण संपवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे तेथे निदर्शने सुरू आहेत.

ठिकठिकाणी झालेल्या हिंसक संघर्षात सहा जणांना जीव गमवावा लागला. अनेक जण जखमीही झाले. आज गुरुवारी आंदोलकांनी देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. तसेच सर्व विद्यापीठे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

सहा जणांचा मृत्यू, शाळा-कॉलेज बंद

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशातही वाद पेटला आहे. या वादात आतापर्यंत किमान 6 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून आरक्षण संपवण्याची मागणी करत आहेत. या आंदोलनाने आता हिंसक रूप घेतले आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 400 हून अधिक जखमी झाल्याचे समजते. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, बुधवार सायंकाळी या आंदोलनाला सुरुवात झाली.  

दरम्यान, विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत एका मुलासह 6 जणांना गोळी लागली आहे. सुरक्षा दलांच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून विद्यार्थ्यांनी गुरुवारी देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. आंदोलन प्रमुख आसिफ महमूदने म्हटले आहे की, रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा वगळता सर्व बंद राहील. याशिवाय, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसाचारात मृत्यू झालेल्यांबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती स्थापन केली जाईल, असेही म्हटले आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश