२४ साक्षीदारांना भारताने साक्षीस पाठवावे -पाक

By Admin | Updated: March 7, 2016 02:58 IST2016-03-07T02:58:22+5:302016-03-07T02:58:22+5:30

मुंबई हल्ल्याची (२६/११) चौकशी करीत असलेल्या दहशतवादविरोधी न्यायालयासमोर (एटीसी) भारताने सगळ्या २४ भारतीय साक्षीदारांना साक्ष देण्यासाठी पाठवावे, असे पाकिस्तानने भारताला म्हटले.

India should send evidence to 24 witnesses - Pak | २४ साक्षीदारांना भारताने साक्षीस पाठवावे -पाक

२४ साक्षीदारांना भारताने साक्षीस पाठवावे -पाक

लाहोर : मुंबई हल्ल्याची (२६/११) चौकशी करीत असलेल्या दहशतवादविरोधी न्यायालयासमोर (एटीसी) भारताने सगळ्या २४ भारतीय साक्षीदारांना साक्ष देण्यासाठी पाठवावे, असे पाकिस्तानने भारताला म्हटले.
सर्व २४ भारतीय साक्षीदारांना त्यांची साक्ष नोंदविण्यासाठी पाकिस्तानात पाठविण्यात यावे, असे पत्र परराष्ट्र मंत्रालयाने भारत सरकारला लिहिले आहे. ही माहिती मुख्य सरकारी वकील चौधरी अझहर यांनी वृत्तसंस्थेला दिली.
गेल्या सहा वर्षांपासून हा खटला सुरू असून, दहशतवादविरोधी न्यायालयाने सगळ्या पाकिस्तानी साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेतली आहे, असे अझहर म्हणाले.

Web Title: India should send evidence to 24 witnesses - Pak