शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:51 IST

India-Pakistan Meeting: फेब्रुवारी 2026 मध्ये कतारची राजधानी दोहा येथे बैठक झाल्याचे वृत्त!

India-Pakistan Meeting: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असले तरी, अनौपचारिक स्तरावर, म्हणजेच ट्रॅक-2 (बॅक चॅनेल) चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये कतारची राजधानी दोहा येथे भारत आणि पाकिस्तानी प्रतिनिधींमध्ये एक अनौपचारिक बैठक झाल्याचे वृत्त आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा दोन देशांमधील अधिकृत संबंध तुटतात किंवा संवाद थांबतो, तेव्हा अशा अनौपचारिक बैठका परिस्थितीचा अचूक अंदाज घेण्यासाठी आणि संवादाचे मार्ग खुले ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात. या बैठका अनौपचारिक असल्यामुळे त्यानंतर कोणतेही संयुक्त निवेदन जारी केले जात नाही किंवा कोणताही देश अधिकृतपणे अशा बैठकींची पुष्टी किंवा खंडन करत नाही.

ट्रॅक-2 (बॅक चॅनेल) चर्चा म्हणजे काय?

ट्रॅक-2 कूटनीती म्हणजे सरकारचे अधिकृत प्रतिनिधी नसलेले माजी अधिकारी, पत्रकार, व्यावसायिक नेते, धोरणतज्ज्ञ आणि नागरी समाजातील प्रतिनिधी यांच्यात होणारी अनौपचारिक चर्चा. या चर्चेचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमध्ये विश्वास निर्माण करणे, नवीन कल्पना आणि उपायांची चाचणी करणे, अधिकृत चर्चेसाठी वातावरण तयार करणे आणि तणाव कमी करण्यासाठी संवाद चालू ठेवणे हा असतो. याउलट ट्रॅक-1 ही अधिकृत सरकार-ते-सरकार चर्चा असते.

ट्रॅक-1.5 कूटनीती काय असते?

जेव्हा देशांमधील संबंध खूप तणावपूर्ण असतात, तेव्हा ट्रॅक-1.5 कूटनीती वापरली जाते. यात सरकारी अधिकारी अनौपचारिकरित्या बाहेरील तज्ज्ञ, संस्था किंवा प्रतिनिधींशी चर्चा करतात. 1993 च्या ओस्लो कराराच्या सुरुवातीच्या टप्प्यात नॉर्वेमध्ये इस्रायली शिक्षणतज्ज्ञ आणि पीएलओ प्रतिनिधींमध्ये अशाच अनौपचारिक बैठका झाल्या होत्या. भारतानेही अनेक आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये पडद्यामागील कूटनीतीचा वापर केला आहे.

भारत-चीन संबंध सुधारण्यात ट्रॅक-2 ची भूमिका

2020 मधील गलवान संघर्षानंतर भारत आणि चीनमधील अधिकृत संपर्क कमी झाले होते. मात्र, ट्रॅक-2 संवाद सुरूच राहिला. याच संवादामुळे 2025 मध्ये तियानजिन येथे एससीओ परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. पुढे 5 वर्षांनंतर ऑक्टोबर 2025 मध्ये दोन्ही देशांमधील थेट उड्डाणे पुन्हा सुरू झाली. व्यापार आणि लोकसंपर्कही हळूहळू पुन्हा सुरू झाले. 

निज्जर प्रकरणानंतर भारत-कॅनडा संबंध बिघडलेले...

हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणानंतर भारत आणि कॅनडा यांचे संबंध अत्यंत तणावपूर्ण झाले होते. मात्र, ट्रॅक-1.5 कूटनीतीनंतर दोन्ही देशांनी व्यावहारिक भूमिका घेतली. यानंतर जून 2025 मध्ये G7 परिषदेत दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भेट आणि नोव्हेंबर 2025 मध्ये G20 परिषदेत चर्चा झाली. त्यानंतर 2026 च्या सुरुवातीला कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यात काही ठोस निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे दोन्ही देशांचे संबंध पुन्हा सुधारले. त्यामुळेच ट्रॅक-2 आणि ट्रॅक-1.5 कूटनीती ही आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 

English
हिंदी सारांश
Web Title : India-Pakistan backchannel talks ongoing amidst tensions; Doha meeting revealed.

Web Summary : Despite tensions, India and Pakistan engaged in 'Track-2' talks in Doha, aiming to maintain communication. These informal discussions, involving non-government figures, foster trust and explore solutions when official channels are strained, easing tensions and paving way for formal dialogues.
टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान