इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 15:31 IST2025-11-26T15:30:36+5:302025-11-26T15:31:39+5:30
Imran Khan : माजी पंतप्रधान इम्रान खान 2023 पासून रावळपिंडी तुरुंगात कैद आहेत.

इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा रावळपिंडीच्या आदियाला जेलमध्ये हत्या/मृत्यू झाल्याची चर्चा/अफवा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या माध्यमांमध्ये पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाण टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी समोर आणली, मात्र पाकिस्तान सरकार, जेल प्रशासन किंवा सैन्य यापैकी कुणीही याबाबत अधिकृत वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे परिस्थिती अधिकच संशयास्पद बनली आहे. 'लोकमत'देखील या दाव्याची पुष्टी करत नाही.
आदियाला जेलबाहेर समर्थकांचे आंदोलन
इम्रान खान यांच्या मृत्यूची अफवा पसरल्यानंतर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे चे हजारो समर्थक आदियाला जेलबाहेर जमू लागले आहेत. रिपोर्ट्सनुसार, स्वतः इमरान खान यांनी हत्या होण्याची भीती काही आठवड्यांपूर्वीच व्यक्त केली होती. इमरान म्हणाले होते, जेलमध्ये माझ्यासोबत काही घडले, तर त्यासाठी सेनाप्रमुख आसिम मुनीर जबाबदार असेल. दरम्यान, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी संस्थेने हाय अलर्ट जारी केली आहे.
2023 पासून इमरान खान तुरुंगात
भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये इमरान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी 2023 पासून आदियाला जेलमध्ये आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली गेलेली नाही, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
रावळपिंडीतील आंदोलने तीव्र
मंगळवारी (25 नोव्हेंबर) मोठ्या प्रमाणात PTI समर्थकांनी रावळपिंडीमध्ये निदर्शने केली. यात इमरान खान यांची बहीण आलिमा खानदेखील सहभागी झाल्या. त्यांनी आरोप केला की, आम्हाला तीन आठवड्यांपासून भेटण्यास मनाई केली जात आहे.
इमरान खानच्या मृत्यूच्या अफवा कशा पसरल्या?
अफगाण टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने इमरान खानच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध केली. सरकारने याचे ना खंडन केले, ना पुष्टी केली, त्यामुळेच शंका आणखी वाढली. डॉनचे वरिष्ठ पत्रकार इफ्तिखार यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून डॉक्टर, वकील किंवा कुटुंबातील कोणालाही इमरान खानला भेटू दिले नाही. त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. जेलमध्ये असलेल्यांनाही सात दिवसांपासून इमरान खान दिसले नसल्याची माहिती आहे. यामुळेच मृत्यूच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले आहे.